Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भारत-चीन सीमाभागातील सैन्यदलात परळी आर्यसमाज स्वामीश्रद्धानंद गुरुकुलचे प्रा.नरेश कान्हेरे यांची ‘‘धर्मगुरू'’ पदी नियुक्ती.


परळी// येथील स्वामी श्रद्धानंद गुरुकुल महाविद्यालयाचे यशस्वी स्नातक व अध्यापक .प्रा. नरेश कान्हेरे हे नुकतेच भारतीय सैन्य दलातील जूनियर कमिशनर ऑफीस धर्मगुरू या पदावर रुजू झाले गुरुकुलात अध्ययन-अध्यापना बरोबरच स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात त्यांनी सात वर्ष संस्कृत विषयाचे अध्यापन केले आहे. याच दरम्यान त्यांनी धर्मगुरू पदासाठी परीक्षा दिली व त्यात ते यशस्वी ठरले. सुरुवातीचे दोन महिने राणी खेत (उत्तराखंड राज्य) येथील कुमाऊं व नागा सैनिकी केंद्रात शारीरिक प्रशिक्षण  पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील दापोडी राष्ट्रीय एकता संस्थानात 3 महिन्यांचे धार्मिक कर्मकांडीय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आर्मी कमांडर ब्रिगेडियर समीर साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ घेऊन त्यांना जूनियर कमिशन ऑफीसर ची रैंक देऊन कमिशन देण्यात आले.
अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमाभागातील तवांग येथे तीन नागा रेजिमेंट मध्ये धर्मगुरू पदावर पहिली पोस्टिंग झाली आहे. गुरुकुल शिक्षण पद्धती नुसार शास्त्री, साहित्याचार्य, एम.ए.बी.एड.आदी संस्कृत योग्यता मिळून अध्यापनाचा अनुभव पाठीशी असलेल्या शांत,  सौम्य व मितभाषी स्नातक श्री.प्रा. नरेश कान्हेरे यांची सैन्यदलात धर्मगुरू या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल गुरुकुल चे प्रमुख संचालक डॉ. ब्रह्ममुनीजी वानप्रस्थी, आर्य समाज परळीचे विद्यमान अध्यक्ष मा.श्री.जुगल किशोरजी लोहिया, आर्य समाज परळी चे मंत्री मा.श्री. उग्रसेन जी राठौर, तसेच आर्य समाज परळीचे कोषाध्यक्ष मा.श्री. देविदासरावजी कावरे, तसेच प्रा. डॉ. नयनकुमारजी विशारद, प्रा. डॉ. वीरेंद्र शास्त्री, प्रा. अरुणजी चव्हाण, प्रा.डॉ. जगदीश कावरे, प्रा. प्रवीणकुमारजी व्यवहारे, तानाजी शास्त्री सर, व्यंकटेश शास्त्री सर, तात्याराव, फुलचंद शास्त्री, दयानंद शास्त्री व स्वामी श्रद्धानंद गुरुकुल मधील आचार्य सत्येन्द्रजी वेद्दोउपासक व वानप्रस्थी पूज्य सोममुनीजी,वैद्य विज्ञानमुनीजी,श्री.अमृतमुनीजी, दयानंद व्यायाम शाळेतील मल्ल, बाल विद्यार्थी, गुरुकुल मधील स्नातक व इतर शिक्षक मित्रांकडून अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.