बीड // बीड तहसील आणि पुरवठा विभागातील भ्रष्टाचार सातत्याने चर्चीला जातो. महसूल विभागातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असतात. आज मात्र प्रशासनातला नंबर २ चा अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडला गेल्याने भ्रष्ट अधिकारी, कर्मचार्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळेंसह बीड तहसील कार्यालयामधील अव्वल कारकून महाकुंडे यांना लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने बीड जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. बी.एम. कांबळे यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानातून जेरबंद करण्यात आले. तर महादेव महाकुंडे यास तहसीलमधून ताब्यात घेण्यात आले.
बीड तहसील आणि पुरवठा विभागातील भ्रष्टाचार सातत्याने चर्चीला जातो. महसूल विभागातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असतात. पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्कर देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी तक्रारदाराकडे पाच लाखाची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने थेट लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. आज सकाळी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांच्या शासकीय निवासस्थान परिसरात सापळा रचला. तर दुसरा सापळा हा तहसील परिसरामध्ये लावण्यात आला. फिर्यादीकडून पाच लाख रुपयांची लाच घेताना बी.एम. कांबळे या अप्पर जिल्हाधिकार्यास त्यांच्या शासकीय निवासस्थानातून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी जेरबंद केले तर या प्रकरणात हस्तक म्हणून असलेला तहसील कार्यालयातील अव्वल कारकून महाकुंडे यास तहसीलमधून ताब्यात घेण्यात आले. दोघांची चौकशी सुरू आहे.
Social Plugin