Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मांडेखेल येथे एका सहा वर्षीय मुलीचा बस अपघातात मृत्यू





खिळखिळ्या झालेल्या बस. त्यातच वारंवार ब्रेक डाउन होणे, टायर फुटणे, तुटलेले छप्पर  एसटीची या दुरवस्थेमुळे अपघातांच्या संख्येत वाढ

परळी// मांडेखेल येथे एका सहा वर्षीय मुलीला बोधेगाव मोहा परळी या बसने आज  चिरडल्याची धक्कादायक घटना  घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि परळी मोहा हि बस क्रमांक एम.एच.20-बीएल-0067 मांडेखेल बस थाब्यां जवळ आली असता मांडेखेल येथील  स्वरा संतोष व्हावळे वय वर्ष 6 हि मुलगी बसच्या उजव्या बाजुच्या मागच्या चाका खाली  आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याघटनेन मांडेखेल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

अपघातांच्या संख्येत वाढ 

परळी  आगारातील बसेसची अवस्था पाहता  प्रवाशांना काळजी वाटतेआहे.
 आगाराकडे असलेल्या बसेसपैकी  अधिक बस खिळखिळ्या झालेल्या आहेत. त्यातच वारंवार ब्रेक डाउन होणे, टायर फुटणे, तुटलेले छप्पर अशी एसटीची अवस्था झाली असून, या दुरवस्थेमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर त्याच त्या बसेस पुन्हा दुरुस्ती रंगरंगोटी करून चालवण्यात येत आहेत. अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत. दरम्यान, रस्ते वाहतुकीतील सुरक्षित प्रवास या अत्यंत महत्त्वाच्या घटकाची सर्वांना जाणीव रहावी, अशी भावना ही प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.