Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हुंडा प्रथा व व्यसनाने समाजात विविध समस्यां निर्माण झाल्या आहेत ते हद्दपार करण्याची गरज आहे-डॉ. सुरेश खुरसाळे




अंबाजोगाई // म. गांधी अध्ययन केंद्र, स्वा रा ती महाविद्यालय मअंनिस,अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजीत आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या अध्यक्षतेखाली 9 फेब्रुवारी 2019 रोजी श्री योगेश्वरी शिक्षण संस्था, नागापूरकर सभागृह, अंबाजोगाई येथे  जोडीदाराची विवेकी निवड" कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली .  या संवादशाळेत स्वारातीचे  विद्यार्थी -विद्यार्थीनी, प्राध्यापक, कर्मचारी,  नागरिक व अंबाजोगाई अंनिसचे कार्यकर्ते यांनी  उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
अध्यक्षीय समारोपात डॉ. सुरेश  खुरसाळे यांनी तरुणांना हुंडा प्रथा व व्यसनाने समाजात विविध समस्यां निर्माण केल्या आहेत ते हद्दपार 
करण्यासाठी प्रेरित केले . यावेळी  अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते संतराम कराड हेही उपस्थित होते.
सहभागी सर्वांनी विवाहसंस्थेतील हुंडा, पत्रिका, व्यसन, हिंसा इत्यादी अनिष्ट व संविधान विरोधी रुढी परंपरा  नाकारण्याचा संकल्प केला .
          कार्यक्रमाच्या सुरुवातीस हेमंत धानोरकर यांनी मंअंनिस च्या " जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवक संकल्प अभियानाची, आवश्यकता पार्श्वभुमी आणि  उद्दिष्ट्ये सांगत परिषदेची सुरुवात केली.
        साहित्यिक बालाजी सुतार यांनी  याउपक्रमाचे कौतुक करत तरुणांना मनापासुन सहभागी होण्यासाठी प्रेरित केले .
 त्यानंतर निशाताई भोसले (सोलापूर) यांनी 'निवड कशी करावी ' या मुख्य विषयावर आधुनिक कुंडलीच्या आधारे तरुणांशी मनमोकळा संवाद केला. या संवादात  तरुणांना  "हुंडा-पत्रिका-व्यसन-कर्ज-हिंसा "  यांना ठामपणे नकार देत विवेकी पद्धतीने जोडीदाराची निवड करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
14 फेब्रुवारी व्हेलेन्टाईन डे च्या पार्श्वभूमीवर जोडीदाराची विवेकी निवड या "जिव्हाळ्याच्या "  विषयावरील संवादशाळेत सर्वांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला  .
हनुमान सोनवणे, स्वाती जाधव, रिंगणनाटक कार्यकर्ता बापू यांसारख्या काही तरुणांनी आपल्या मनोगतात स्वतःच्या जीवनातून हुंडा-व्यसन-हिंसा यांना हद्दपार करुन विवेकी विचार करणार असल्याचे सांगितले.
 अंबाजोगाई अंनिस कार्यकर्ते कृष्णा आघाव, गणेश कदम, निळकंठ जिरघे, सोनपीर सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेतले. म.गांधी अध्ययन केंद्राच्या संचालिका प्रा. शैलजा बरुरे यांनी सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले .