अंबाजोगाई //अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचेनगरसेवक विजय शेषेराव जोगदंड वय ३४, रा. परळी , अंबाजोगाई यांचा आज परळी वेस येथे भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्यारात्री 8 : 30 वाजताच्या दरम्यान खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. अंबाजोगाई येथे झालेल्या भांडणात धारदार हत्यारांच्या साह्याने जोगदंड यांच्यावर वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .
वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
Social Plugin