परळी //तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास काहीही अशक्य नाही असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय परळी मध्ये आला आहे. येथील दोन ते तीन वयाच्या हरवलेल्या 2 मुली सकाळी 10 वाजता घरून निघाल्या आणि घराचा रस्ताच विसरून गेल्या आणि भटकत वैधनाथ मंदिर परिसरात आल्या .
परळी येथील सावता माळी नगर मधील सुरेश वैजनाथ फुके यांच्या 2 व 3 वयवर्ष असलेल्या मुली सकाळी 10 वाजता घरून निघाल्या आणि घराचा रस्ताच विसरून भटकत वैधनाथ मंदिर परिसरात मैड यांना दिसून आल्या त्यांनी पोलीस ठाण्यात कळविलेसुध्दा . मिळताच त्यांनी मुलींची तात्काळ चौकशी सुरू केली. परंतु त्यांना बोलता येत नसल्याने पालकांचे व त्याचे नाव समजले नाही. मैड यांनी व्हॉट्सअपवर फोटो अपलोड करून ओळख पटवण्याचे आवाहन केले.
माणिकनगर मधील सामाजिक कार्यकर्ते नरेश मैड यांच्या दिवसभराच्या अथक प्रयत्न आणि व्हॉट्सअॅपमुळे हरवलेल्या त्या 2 मुलींना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यास मदत झाली . अनेक ठिकाणी झोपडपट्टीत चौकशी केल्यानंतर या दोन मुलींना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आल्याचे मैड यांनी सांगितले.
हे मुलाचे पालक असल्याची खात्री झाल्यानंतरच मुली त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. नरेश मैड यांच्या या मदतीमुळे दोन चिमुकल्यांना त्यांचे घर मिळाले म्हणून नरेश व मीडियाचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहेत याबद्दल त्यांचे आभिनंदन होतं आहे.
Social Plugin