Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

● वाळु मोफत द्या! परळी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी ..


● घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 10 ब्रास वाळु मोफत द्या!
परळी //..शहरातील घरकुल मंजुरी झालेल्या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी 10 ब्रास वाळु मोफत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आंदोलन करण्याचाही इशारा माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिला आहे.
          राज्याचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार परळी शहरातील रमाई आणि पंतप्रधान आवास योजनेमधील लाभार्थ्यांना मोफत 10 ब्रास वाळू शासनाने द्यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दि. ९ रोजी  देण्यात आले.  उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने नायब तहसिलदार रूपनर आणि तहसीलदार यांच्यावतीने नायब तहसीलदार सदानंद  बरदाळे  यांनी निवेदन स्वीकारले. परळीतील सर्व घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 10 ब्रास वाळु मोफत द्या अन्यथा लाभार्थ्यांसह तीव्र आंदोलन  करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
     यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी, पांडूरंग गायकवाड,अजीज कच्छी, भाऊसाहेब कराड, शेख शरीफ, अनंत इंगळे, जयप्रकाश लड्डा, बाशीद शेख, शंकरराव आडेपवार, जयपाल लाहोटी, गोविंद कुकर, महादेव रोडे, सुभाष वाघमारे, अनिल अष्टेकर, गोपाळ आंधळे, महेंद्र रोडे, अलताफ पठाण, संग्राम गित्ते, महेबुब कुरेशी, रवि मुळे, गफार काकर, गणेश सुरवसे,बळीरामनागरगोजे,किशोर केंद्रे, शरद चव्हाण, वाजेद खान, नाजेर हुसेन, अमर रोडे, धम्मा आवचारे, प्रताप समिंदरसवळे, रमेश मस्के, सुलभा साळवे, वैशाली तिडके, तकी खान, अजू खान, उमेश सुरवसे, सतिष गंजेवार, हनुमंत आगरकर, मोईन काकर, केशव गायकवाड, गोदावरी पोखरकर आदीं सह नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.