Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दृढ निश्चय, ग्रामीण विकासाचा ध्यास, अभ्यास, संघटन कौशल्य, कामात सातत्य ठेवा ..अशक्य .ते शक्य होईल ----डॉ. हनुमंत भोपाळे


नांदेड //  जन्मतःच कोणी व्यसनी असत नाही. दृढ निश्चय, आत्मविश्वास सुसंगत आणि तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल केल्यास व्यसनाधीनता संपुष्टात  येते. तणावावरील एक औषध म्हणून व्यसनाकडे पाहिल्याने आणि चुकीचे विचार स्विकारल्याने व्यक्ती व्यसनाधीन होण्याची शक्यता असते.स्वतःचे ,समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून युवकांनी  व्यसनापासून दूर राहावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक तथा व्याख्यातू  डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केले.

 परभणी जिल्ह्यातील कोल्हा येथील हनुमान मंदिर सार्वजनिक गणेश मंडळ व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने ग्रामीण विकासात युवकांचे योगदान याविषयावर आयोजित  व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा प्रवचनकार  शिवेंद्र चैतन्य महाराज, प्रा. डॉ. भिसे आदीजण उपस्थित होते.
 पुढे बोलताना डॉ. भोपाळे  यांनी  गावाचा विकास  करण्यासाठी दृढ निश्चय, ग्रामीण विकासाचा ध्यास, अभ्यास, संघटन कौशल्य, कामात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. विकासाच्या ध्यासातूनच नेतृत्व करण्याची संधी मिळते. इतिहासात नोंद होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत  न  डगमगता  आपण  आपले  ग्राम विकासाचे सर्वांनी ध्येय  गाठले  पाहिजे. सार्वजनिक उत्साहात जमा केलेला पैसा वाचनालय,वस्तीगृह आणि अभ्यासिकेसाठी खर्च केल्यास शैक्षणिक क्रांती घडवून येण्यास मदत होईल तसेच  युवकांनी लोकसहभाग आणि प्रशासन, शासनाची याकामी सहकार्य घ्यावे असे सांगितले. बिनभरवशाच्या शेतीवरच अवलंबून न राहता
शेतीलापूरक  व्यवसाय  ,व्यापार,उद्योगाची उभारणी करण्याची गरज आहे. समस्या निर्माण झाली म्हणून आत्मघातकी मार्ग न अवलंबिता लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची हिंमत ठेवून वाटचाल केल्यास प्रगती शक्य असल्याचे प्रेरणादायी प्रतिपादन डॉ. भोपाळे यांनी केले.जे व्यसनाधीन झाले आहेत त्यांनी व्यसन सोडण्यासाठी तयार व्हा मी तुमच्या पायावर डोकं ठेवायला तयार असल्याचे भावनिक आवाहन केले.
गावकरी आणि युवकांनी डॉ. भोपाळे यांच्या व्याख्यानाला भरभरून प्रतिसाद दिला.
 स्वामी  शिवेंद्र चैतन्य  यांनी  गणेशोत्सव साजरा  करताना  असे  प्रबोधन  कार्यक्रम आयोजित केले  पाहिजे  ,ज्यामुळे  युवक  स्वत : ची  प्रगती  करू शकतो.  युवकांनी  विकासाची चार  सूञ सांगितले.  नोकरीमध्ये  जाण्यासाठी  प्रयत्न केला  पाहिजे. पण  नोकरी मिळाली नाही तर  स्वत  चे  व्यवसाय सुरू करून  विकास  करावा.  असे  विचार  स्वामी शिवेंद्र चैतन्य  यांनी सांगितले.  प्रास्तविक  डाॅ.  रामचंद्र भिसे यांनी  व्याख्यान आयोजित  करण्याची  भूमिका  स्पष्ट केली.  कार्यक्रमाचे  सूञसंचलन   निर्गुण   सूर्यवंशी  केले.  आभार  अर्जुन  भिसे  मानले. डॉ. हनुमंत भोपाळे यांनी गावातील  सुरू  असलेल्या  स्पर्धा  परीक्षा  अभ्यासिका ला भेट देऊन अभ्यासिकाला भेट देऊन विद्यार्थींना अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले.त्यांनी लिहिलेले यशाचा राजमार्ग, ध्येयवेध हे पुस्तकं भेट दिले. या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुकही केले. ग्रामीण भागात  राबवला जाणार  हा  आदर्श  उपक्रम आहे  असे  विचार व्यक्त केले.   यावेळी  उध्दवराव भिसे, सोपान भिसे,  गोपाळराव भिसे,  दत्तात्रय भिसे,  कुष्णा  भिसे,  तुकाराम भिसे  सखाराम  भिसे  हे  उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्रफुल्ल  जैन,  वैजनाथ  भिसे,  गिरी  वशिष्ट,  दत्ता  भिसे,  आदी  गणेश  मंडळ  पदाधिकारी  प्रयत्न केले. यावेळी  गावकरी ,तरूण व  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.