सक्षम व ज्ञानाने परिपूर्ण असलेले विद्यार्थी देशाची प्रगती करू शकतात.
- डाॅ.सुरेश खुरसाळे
अंबाजोगाई // विद्यार्थी दशेतच कायद्याचे ज्ञान मिळण्यासाठी देशभरातील शाळांमध्ये लिगल लिटरसी क्लब स्थापन करण्यात येत असून अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात सोमवारी दि.3 रोजी क्लबची स्थापना करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये आणि जिल्हा विधि सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शाळांमध्ये लिगलटरसी क्लब स्थापन करण्यात येत आहेत. अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात सोमवारी क्लबची स्थापना झाली.
विद्यार्थ्यांना कायद्याची व हक्काची जाणीव असणे आवश्यक आहे. समाजामध्ये जागृती करुन परिवर्तन घडवायचे असेल तर शालेय विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन जागृती केल्यास परिणामकारक ठरते. असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी केले. ते अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात लिगल लिटरसी क्लबच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
क्लबचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम , दिवाणी न्यायाधीश इ.के.चौगले यांच्या हस्ते झाले.
व्यासपीठावर सरकारी वकील अशोक कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सुरेश खुरसाळे कार्यकारी उपाध्यक्ष अॅड. शिवाजीराव कराड, सचिव अॅड.उदयकुमार कामखेडकर, सहसचिव माणिकराव लोमटे,वकील संघाचे अध्यक्ष अॅड .शरद लोमटे , मुख्याध्यापिका के.टी.व्यास यांची उपस्थिती होती.
न्यायाधीश इ.के.चौगले म्हणाले, विद्यार्थ्यांना मुलभुत कायद्याची माहिती असने आवश्यक आहे. त्यांना अधिकाराची माहिती असायला हवी.सक्षम व ज्ञानाने परिपूर्ण असलेले विद्यार्थी देशाची प्रगती करू शकतात.
अध्यक्षीय समारोपात डाॅ.सुरेश खुरसाळे यांनी , साक्षरता विकसीत करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. कायद्याचा उद्देश म्हणजे न्यायाचे राज्य निर्माण करणे होय. अक्षर साक्षरता, संगणक साक्षरता, जलसाक्षरता आता कायदेविषयक साक्षरता शालेय स्तरावरुन करणे गरजेचे आहे. हे ओळखून हा स्तुत्य उपक्रम उच्च न्यायालयाच्या आदेशाने राबविला जात असल्याचे ते म्हणाले.
लिगल लिटरसी क्लबमार्फत मुलांना कायदेविषयक ज्ञान दिले जाणार आहे. तसेच निबंध, वक्तृत्व, स्पर्धा परिक्षेसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. मुलांना न्यायालयात चालणारे न्यायदान विषयक कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मु.अ.के.टी.व्यास यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक अमृत महाजन यांनी करून भागवत मसने यांनी आभार मानले. या वेळी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी , क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Social Plugin