आष्टी // आष्टी तहसिल कार्यालयात पुरवठा विभागातील नायब तहसिलदार सुभाष कट्टे दोन हजार रुपयाची लाच घेताना बीड येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहे स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणी प्रकारणात ही लाच घेतल्याचे माहिती समोर आली आहे.
आष्टी येथे पुरवठा विभागात काही महिन्यापुर्वी नायब तहसिलदार पदभार स्विकारलेले सुभाष कट्टे यांना बीडच्या लाचलुचपत विभागाने सोमवार दि. 03 सप्टेंबर रोजी एका राशन दुकानदाराकडुन स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणीबाबत दोन हजार रुपयाची मागणी केली असता हा प्रकार स्वस्त धान्य दुकानदाराने अगोदर लाचचलुचपत अधिका-यांना सांगीतले होते त्यामुळे आष्टीच्या तहसिल कार्यालयात सापळा रचून आज दुपारी अटक कार्यवाही बेलगाव येथील कैलास पोकळे यांच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Social Plugin