अंबाजोगाई शहरात चोरट्यानचा धुमाकुळ
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई तालुक्यातील मौजे मोरेवाडी येथील कैलास नगर येथे दि. ३ सप्टेंबर २०१८ रोजी मध्यरात्री अंदाजे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोर्याट्यांनी घरातील कंपाउड वालचे मेनगेटचे कुलूप तोडून दोन मोटार सायकल लंपास केल्याने अंबाजोगाई शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कैलास नगर येथे श्री.दरवेशवार संदीप दिगंबरराव हे शिक्षक असून यांच्या मालकीचे घर आहे. व त्यांच्या घरात किरायाने उमेश काशिनाथ घोडवाडे हे राहतात. उमेश घोडवाडे हे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. अज्ञात चोरट्यांनी दि.३ सप्टेंबरच्या मध्यरात्री अंदाजे २ ते ३ वाजता घरातील कंपाउंड वालचे मेनगेटचे कुलूप तोडून दोन मोटार सायकली हातोहात लंपास केल्या. ज्याचा गाडी क्र.एम.एच.४४ जे.५०५२ स्पेलेंडरप्लस व दुसरी गाडी क्र.एम.एच.४४ पी.४७०४ स्पेलेंडरप्लस या दोन्ही गाड्यांची किंमत अंदाजे ९० हजार रूपये आहे. अज्ञात चोरटे हे सराईत गुन्हेगार दिसतात. कारण चोरट्यांनी दोन्हीगाड्या मेनगेटचे कुलूप तोडून लंपास केल्या. म्हणजे त्यांनी चोरी करण्याअगोदर घरावर पाळत ठेवली होती, असे दिसून येते अंबाजोगाई शहरात वाहन चोरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या प्रकरणी पोलिसंानी सराईत चोरट्यांना पकडून त्यांच्याकडुन मुद्देमाल हस्तगत करावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे. एकाच रात्री एकाच घरातून दोन मोटार सायकल चोरीला गेल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद देण्यात आली व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Social Plugin