अंबाजोगाई // येथील इनरव्हील क्लब अंबाजोगाई यांनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणार्या दहा शिक्षकांना राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक (नेशन बिल्डर अवॉर्ड) पुरस्कार देवून सन्मानित केले. गुरूवार ,दि.20 सप्टेंबर रोजी लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अंबाजोगाई शहरातील इनरव्हील क्लबने शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणार्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेवून त्यांना राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक (नेशन बिल्डर अवॉर्ड) पुरस्कार देवून सन्मानित केले.एकुण दहा शिक्षकांना या अवॉर्डचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले. महिलांची प्रगती झपाट्याने होत आहे.हे प्रगत समाजाचे लक्षण असून दरवर्षी इयत्ता 10 वी व 12 वी च्या निकालात मुलीच प्रथम येतात.आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिलांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे दिसते . याप्रसंगी बोलताना प्रतिभाताई देशमुख यांनी इनरव्हील क्लबच्या आदर्श शिक्षक पुरस्कारात पारदर्शकता असल्याचे सांगुन शिक्षक हा एक विचार आहे.हा विचार समाजाच्या सर्व क्षेत्रात पाझरत ठेवण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.एक विचार, एक कृती समाजात मोठे बदल घडवत असते.हे सांगुन आपले कार्य यापुढे चांगले व्हावे यासाठी असे पुरस्कार बळ देतात असे विचार प्रतिभाताई देशमुख यांनी व्यक्त केले. विचारमंचावर बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रतिभाताई देशमुख, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सोनाली कर्नावट,सचिव सुहासिनी मोदी,रंजना कराड आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते वैशाली अरूणराव भुसा
(अंबाजोगाई),
शितल अंकुशराव काळदाते (मोरेवाडी),
राजाभाऊ संभाजी कांबळे (अंबाजोगाई),
महेश मारोती भस्मे (अंबाजोगाई),
प्रणव योगीराज स्वामी
(चनई), केशव विनायकराव काकडे (बनसारोळा),सुनिल पवार (येल्डा),उत्तम धनु राठोड (होळ) या दहा शिक्षकांना राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक (नेशन बिल्डर अवॉर्ड) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराचे वैशिष्ट्ये असे की, शाळेचे विद्यार्थी यांनी आपले आवडते शिक्षक कोण हे पुरस्कार निवड समितीला सांगितले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपक्रमशिल शिक्षकांची माहिती निवड समितीला दिली.या दोन्ही माहितीच्या अधारे गुणांकन करून पुरस्कारासाठी सदर शिक्षकांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना सभापती राजेसाहेब देशमुख यांनी इनरव्हील क्लबच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल क्लबचे व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.हा सन्मान सोहळा आपल्या कुटुंबासोबत होतो.याला आयुष्यात खुप महत्व असल्याचे सांगुन प्रत्येक मोठ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेची शाळा दत्तक घ्यावी असे आपले प्रामाणिक मत आहे.हे सांगून पुढील काळात वर्ग पाचवी पासून विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम देणारे शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती दिली.
अध्यक्षीय समारोप सोनाली कर्नावट यांनी केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिना डागा व गिता परदेशी यांनी केले.तर प्रास्ताविक सुरेखा सिरसट यांनी करून उपस्थितांचे आभार रोहिणी राजमाने यांनी मानले.यावेळी सभागृहात आनंद कर्नावट,अंकुशराव काळदाते,प्रा.अनंत कांबळे,प्रा.सचिन कराड,इनरव्हीलचे पदाधिकारी,शहरातील मान्यवर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इनरव्हील क्लबच्या
पदाधिकारी नगरसेविका राजश्री मोदी, नगरसेविका वासंती बाबजे,अंजली रेवडकर,सुवर्णा बुरांडे, वैजयंती टाकळकर, अनिता फड,पञकार किरण देशमुख, शिवकन्या साळुंके, रंजना दराडे,रेखा शितोळे,सुरेखा मुथा, शिवकन्या गायकवाड, वनमाला बुरांडे,कोमल काञेला,सुनिता काञेला,जयश्री लोढा, रोहिणी लोमटे,सरीता जाजू,अश्विनी भुसारे, सारीका घुगे,धनश्री भानप,बगाडे मॅडम, दिपाली चोकडा, देशमुख मॅडम,दिपा धुत,शोभा बाभुळगावकर यांनी पुढाकार घेतला.
Social Plugin