मुंबई // काँग्रेससोबत युतीचा आपण विचार करू पण राष्ट्रवादी हा जातीयवादी पक्ष असल्याने त्यांच्यासोबत जाणार नाही, असे अॅड. आंबेडकर यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत म्हटले होत अकोल्यात झालेल्या निवडणुकीत दोनदा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता तेव्हा आमचा पक्ष जातीयवादी नव्हता का, असा चिमटा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना काढला.
े. त्यावर नेहरू सेंटर येथे स्वत:च्या चित्रांवर भरलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, मला वर्ष आठवत नाही. पण, ईशान्य मुंबईत आमच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आंबेडकर यांच्या पक्षाने डॉ. नीलम गोºहे यांना उभे केले होते. त्याचा लाभ भाजपाचे प्रमोद महाजन यांना झाला होता. भाजपाला लाभ पोहोचवण्यासाठी उमेदवार उभे करण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे लोक इतरांना धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी सांगू नयेत, असेही पवार म्हणाले.
Social Plugin