Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अनुष्ठानाने आत्मानंदाची प्राप्ती-डॉ.गुट्टे महाराज


श्रावणमास तपोनुष्ठान सोहळ्यानिमित्त

परळी  //
अनुष्ठानाने  आत्मानंदाची प्राप्ती असे मत डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज  यांनी   येथे बोलताना व्यक्त केले,      परळी वैद्यनाथ येथील श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट,आणि लिंगायत समाज व भक्तगण परळी वै यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तथा वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या ८२ व्या श्रावणमास तपोनुष्ठान सोहळ्यानिमित्त येथील अनुष्ठान सभामंडपात  बुधवारी आशीर्वचनपर मार्गदर्शन करताना संत साहित्याचे गाढे अभ्यासक व युवाप्रचारक प.पू स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे बोलत होते.
भक्तीमध्ये मनाला श्रेष्ठ स्थान दिले जाते, प्रसन्न मनाने भक्ती केल्यास सर्वसिद्धी प्राप्त होते, समाजातील वाईट चालीरीती सोडून माणसाने सन्मार्गाला लागावे, सन्मार्ग हा संतसंगतीमुळे कळतो, त्यामुळे संतांची संगत ही समाजाला दिशादर्शक ठरते. आणि श्रावणमास तापोनुष्ठान सोहळ्यात संतसंगती, सद्विचार व भक्ती अश्या त्रिवेणी संगमाचा लाभ होतो. तपामुळे आत्मबल वाढते, आत्मस्वरूपाची जाणीव होते, मनाला जाणिवेच्या पुढे नेऊन एक विशिष्ट स्वरूपाचे दर्शन होते. ध्यानामुळे मन शांती मिळते, आणि ध्यान,मन व पवित्रता यांचे अनुसंधान साधत एका जागेवर बसून सुक्ष्मतील सूक्ष्म नियम पाळून केलेली साधना म्हणजेच अनुष्ठान होय आसे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व युवाप्रचारक प.पू स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांनी केले. यावेळी महाराजांचे अनुष्ठान समितीच्या वतीने बाळासाहेब देशमुख यांनी स्वागत केले याप्रसंगी डॉ.विरुपाक्षर स्वामी, अनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे,संजय खाकरे, पत्रकार गोपाळ सोनी यांसह आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.