मुंबई: महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जसलोक रुग्णालयात वाडेकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं क्रिकेटविश्वातील मोठा तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. परदेशी भूमीवर भारताला विजयाची सवय लावून देणारा कर्णधार अशी वाडेकर यांची ओळख होती.
अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतानं परदेशात पहिली कसोटी मालिका जिंकून दिली होती
Social Plugin