परळी वैजनाथ : माणिक नगर दुर्गोत्सव मंडळ दुर्गोत्सवानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा हजारो भक्त-भाविकांनी लाभ घेतला. या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
दुर्गामातेच्या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादासाठी मंडळाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. परिसरात मंडप उभारून भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.
भाविकांना व्यवस्थितपणे महाप्रसाद मिळावा, यासाठी मंडळाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक परिश्रम घेत होते. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सेवाभाव जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. माणिक नगर दुर्गाउत्सव मंडळचे अध्यक्ष राजेश विभूते व
माणिक नगर दुर्गोत्सव मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, दुर्गोत्सवातील भक्ती, सेवा आणि सामाजिक एकतेचे दर्शन या महाप्रसादाच्या आयोजनातून घडले.





0 टिप्पण्या