Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तुळजापुराच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांचा पाच जणांचा जागीच मृत्यू

 खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी जवळ बस आणि कारचा समोरासमोर अपघातात पाच जण जागीच ठार 

 माजलगाव: तुळजापुरला दर्शनासाठी निघालेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील भाविकांच्या कारचा आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्या ची दुर्दैवी घटना घडली घटनेची माहिती माजलगाव तालुक्यात  पसरताच पूर्ण माजलगाव तालुक्यावर शोककडा निर्माण झाली आहे.

 सविस्तर वृत्त असे की आज सकाळी १०:२०मिनटाच्या सुमारास माजलगावातून तुळजापुराला दर्शनासाठी जात असताना खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी जवळ माजलगावकडे येणारी बस आणि तेलगाव कडे जाणारी कारचा १०:४९मिनटाच्या सुमारास समोरासमोर अपघातात झाला अपघातात पाच जण जागीच ठार झाले



अपघात एवढा भीषण होता की, एअर बॅग सुद्धा फुटले होते.अपघातात मरण पावलेले मयतांची नाव १) गजानन महादेव नामदसे वय (३७) २) समर्थ गजानन नामदसे दोन्ही राहणार पाचपीर भाटवडगाव माजलगाव ३) सोमनाथ बडे वय (२३) रा. फुलेनगर माजलगाव ४) ओम महादेव गिरी वय 24 राहणार माजलगाव ५) अनिल शेन (आचारी)रा. राजस्थान 

या भीषण अपघातात सर्व पाचजण जागीच मरण पावले विशेष म्हणजे या पाच जणात बाप लेकाचा हे समावेश आहे.घटनास्थळावरून मयताला  शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या