आपला ई पेपर/परळी प्रतिनिधी
परळी ते घाटनांदूर रेल्वे ट्रॅकवर लेंडेवाडी ता. परळी वैजनाथ शिवारात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, नागरिकांनी ओळख पटवण्यास मदत करावी, असे आवाहन परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लेंडेवाडी शिवारातील रेल्वे ट्रॅकवर एक मृतदेह आढळून आला आहे स्थानिका परळी ग्रामीण पोलिसांना माहितीनुसार. मृत व्यक्तीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे
मृताच्या अंगात चॉकलेटी आणि पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा चेक्स शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, आकाशी रंगाची डिक्सी स्कॉट कंपनीची अंडरवेअर असून, खिशात लाल चेक्स असलेला रुमाल आहे. तसेच पायात लेस नसलेले (विदाऊट लेस) हिरव्या-पांढऱ्या रंगाचे बूट आहेत.
या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास किंवा ओळख पटल्यास त्यांनी तातडीने परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक एम.ए.सय्यद (मो.क्र. 8793931595) किंवा सपोनि सदानंद मेंडके (मो.क्र. 7447554607) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या