Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीतील रुग्णसेवेतील दीपस्तंभ : डॉ. विवेक दंडे यांचे प्रेरणादायी कार्य

आपला ई पेपर/परळी प्रतिनिधी


परळी शहरात वैद्यकीय क्षेत्रात विश्वास, आपुलकी आणि सेवाभाव यांचे प्रतीक म्हणून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, त्या व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. विवेक  डिंगबर  दंडे. प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ स्वर्गीय डॉ. डिंगबर  दंडे यांचा रुग्णसेवेचा समृद्ध वारसा अत्यंत सक्षमपणे पुढे नेत त्यांनी हजारो रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला आहे. आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि उत्कृष्ट वैद्यकीय ज्ञानामुळे त्यांनी परळी शहरासह पंचक्रोशीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

डॉ. विवेक दंडे हे केवळ डॉक्टर नाहीत, तर अनेकांसाठी आधारवड आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या अडीअडचणी समजून घेत ते अत्यंत माफक शुल्कात उपचार करतात. अनेक वेळा आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या रुग्णांकडून फीही घेत नाहीत. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आत्मीयता आणि कृतज्ञतेची भावना आहे.

रुग्णांशी संवाद साधण्याची त्यांची शैली अत्यंत आपुलकीची आहे. प्रत्येक रुग्णाची विचारपूस, मानसिक धीर आणि हसतमुखाने दिलासा देण्याची त्यांची सवय रुग्णांच्या अर्ध्या वेदना कमी करते. वैद्यकीय क्षेत्रातील निदान करण्याची त्यांची अचूक पद्धत आणि अनुभवामुळे अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. हजारो रुग्णांना त्यांनी योग्य उपचार देत बरे केले आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवले.

विशेष म्हणजे, रुग्णसेवा हेच आपले कर्तव्य मानून ते दिवस-रात्र तत्पर असतात. रात्री अपरात्री कोणत्याही वेळी फोन आला तरी ते तत्काळ प्रतिसाद देतात. ही सेवाभावाची वृत्तीच त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. समाजातील प्रत्येक घटकाच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचा त्यांचा स्वभाव त्यांना खऱ्या अर्थाने लोकांचे डॉक्टर बनवतो.

स्वर्गीय डॉ. डिंगबर  दंडे यांनी ज्या निष्ठेने आणि सेवाभावाने वैद्यकीय क्षेत्रात कार्य केले, त्याच मूल्यांचा वारसा डॉ. विवेक दंडे यांनी जपला आहे. स्वतःच्या कष्टावर, जिद्दीवर आणि प्रामाणिक सेवाभावावर त्यांनी समाजात मोठा नावलौकिक मिळविला आहे. आज परळी शहरातील वैद्यकीय क्षेत्रात “रुग्णसेवेतील दीपस्तंभ” म्हणून त्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते.