परळी तालुक्यातील क्रीडा संस्कृती समृद्ध होत असल्याचा अभिमान वाटतो -प्रसिद्ध सर्जन डॉ. हरिश्चंद्र वंगे दादा
माउंट लिटरा स्कूल प्रशासन, शिक्षकवर्ग व क्रीडा शिक्षक संघटना पदाधिकारी यांचे सर्वत्र कौतुक
परळी (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने व परळी क्रीडा शिक्षक संघटनेच्या सहकार्याने माउंट लिटरा झी स्कूलच्या क्रीडामैदानावर परळी येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. क्रीडा मैदानावर 14 वर्षे वयातीलखेळाडूंपासून ते 19 वर्ष वयोगटातील खेळाडूंपर्यंत सर्वांनीच कौशल्याचे उत्तम प्रदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रसिद्ध सर्जन डॉ. हरिश्चंद्र वंगे दादा यांनी पार पाडली. उद्घाटन सोहळा श्री. इटके गुरुजी व श्री. सुभाष नाणेकर सर यांच्या हस्ते पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून वैधनाथ विद्यालय परळीचे मुख्याध्यापक श्री. अजय जोशी व न्यू हायस्कूल गेवराईचे मुख्याध्यापक श्री. सुनील चव्हाण उपस्थित होते. तसेच माउंट लिटरा स्कूलचे उपाध्यक्ष प्रा. कैलास घुगे, व परळी क्रीडा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला.
तालुक्यातील एकूण 28 शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. मुला-मुलींचे अंडर 14, अंडर 17 व अंडर 19 अशा गटांमध्ये सामने रंगले. तुफानी चुरशीच्या या सामन्यांमध्ये खेळाडूंनी केवळ विजय मिळविण्याचा प्रयत्न न करता, शिस्त, टीम स्पिरिट व क्रीडाभावनेचे दर्शन घडविले.
🏆 विजेत्या संघांचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला –परळी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा निकाल
14 वर्षे मुले
1) माउंट लिटरा स्कूल प्रथम
2)शासकीय निवासी शाळा द्वितीय
17 वर्ष मुले
1)भेल स्कूल प्रथम
2)आसूबाई विद्यालय मांडेखेल द्वितीय
19 वर्षे मुले
1)राजश्री शाहू महाविद्यालय कवडगाव प्रथम
14 वर्षे मुली
1)कैलास विद्यालय तपोवन प्रथम
2)दिल्ली पब्लिक स्कूल द्वितीय
17 वर्षे मुली
1)महाराष्ट्र विद्यालय मोहा प्रथम
2)आसूबाई विद्यालय मांडेखेल द्वितीय
19 वर्षे मुली
1)महाराष्ट्र विद्यालय मोहा प्रथम
2)राजश्री शाहू विद्यालय कवडगाव द्वितीय
विजयी संघाना आता जिल्हा स्तरीय स्पर्धेत परळी तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अधिक प्रगती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याने तालुक्यातील क्रीडा संस्कृती समृद्ध होत असल्याचा अभिमान व्यक्त केला.स्पर्धेचे सुयोग्य नियोजन व उत्कृष्ट व्यवस्थापन केल्याबद्दल माउंट लिटरा स्कूल प्रशासन, शिक्षकवर्ग व क्रीडा शिक्षक संघटना पदाधिकारी यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
प्राचार्य मंगेश काशीद यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडाशिक्षण अत्यावश्यक आहे. अशा स्पर्धांमुळे मुलांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि टीम स्पिरट तयार होते.

Social Plugin