संस्कार आणि दैनंदिन योगा हे जीवनात महत्वपूर्ण - सुमेंद्र शास्त्री
परळी /प्रतिनिधी
मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मैदानी खेळ व्यायाम लुप्त पावत असून मुलांमध्ये मोबाईलचे वेड लागले आहे. यामुळे शरीर सुदृढ न राहणे, ब्रेन ट्यूमर या अशा अनेक समस्या वर एकच उपाय म्हणजे दैनंदिन व्यायाम होय.आज दि 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने माऊंट लिटरा झी स्कूल
येथे विद्यार्थी व शिक्षक यांना आज सकाळी 8:30 ते 10 यावेळेत योगासने व योगाचे महत्त्व काय यावर निमंत्रित योग गुरु सुमेंद्र शास्त्री यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून हनुमान व्यायाम शाळेचे जेष्ठ दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध योगासनाचे फायदे सांगून आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माऊंट लिटर झी स्कूलचे सुप्रसिद्ध डॉ.हरिश्चंद्र वंगे, कैलास घुगे, प्राचार्य मंगेश काशीद सर व प्रमुख अतिथी दत्ताप्पा ईटके, डॉ. कुणाल जैन, प्रा. बांगर सर, प्राचार्य अतुल दुबे, शिवशंकर अण्णा,सायस मुंडे ,सौ. सोनाली मुंडे, माऊली मुंडे, नंदकिशोर पुजारी, नितीन कुलकर्णी, जगन्नाथ रामदासी, शिवम गर्जे व शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला.
दि. 21 जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून घोषीत केलेला आहे, राज्यात व जिल्हयात योग दिन मोठया प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्ताने माऊंट लिटर झी स्कूल येथे इंटरनॅशनल योगा चॅम्पियनशिप मलेशिया गोल्ड मेडलिस्ट सुप्रसिद्ध योग शिक्षिक सुमेंद्र शास्त्री यांना निमंत्रित केले होते.
यावेळी योगा शिक्षिक शास्त्री यांनी बोलताना योगाभ्यासामुळे जीवनात किती बदल होतात, योगा हे जीवनात किती महत्वपूर्ण आहेत याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
Social Plugin