Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

India | राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत गुजरात संघ प्रथम तर महाराष्ट्रचा दुसरा क्रमांक

 आपला ई पेपर प्रतिनिधी मुंबई 



ऑल इंडिया लंगडी असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील  लंगडी स्पर्धा नुकत्याच तामिळनाडू राज्यातील परमकोडी येथे असलेल्या कविना इंटरनॅशनल स्कूल येथे संपन्न झाल्या. यास्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार प्राप्त तथा मि. इंडिया श्रीनिवास सर यांनी केले.

स्पर्धेत महाराष्ट्र सब ज्युनियर गर्ल्स संघाने प्रथम कर्नाटक, केरळ, तामिळनाडू संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत बाजी मारली . परत केरळला उपांत्य फेरीत नमवून संघाने अंतिम फेरीत धडक मारली. दुसर्‍या गटातून गुजरात संघाने पुडुचेरी, गोवा, आंध्रप्रदेश व इतर संघांना नमवून अंतिम फेरी गाठली.

गुजरात व महाराष्ट्र अंतिम सामन्यात गुजरात संघाने सुरुवाती पासूनच सामन्यावर पकड निर्माण केली व शेवटी महाराष्ट्र सब ज्युनियर गर्ल्स ह्या संघाला नमवून गुजरात देशात अव्वल झाला. महाराष्ट्र संघाची कर्णधार म्हणून दिक्षा गाडे व उपकर्णधार वर्षा जगताप तसेच संघाकडून स्वरुपा दराडे, नम्रता धस, दिपाली रेडे, श्रेया घाणे, रश्मी बुरसे, अपूर्वा पाटील, श्रिया विरणक, मनिषा सोले, संस्कृती कोळी, पुर्वा जोशी, संगम पाईकराव, प्रियंका पवार , आकांक्षा नरवाडे खेळाडू सहभागी होते. 

महाराष्ट्र संघासाठी क्रीडा शिक्षक संजय इंगळे सर , व गजानन दंदे सर बीड, सौ.शुभदा देसाई मॅडम मुंबई, नामदेव रणबीर सर हिंगोली, अमोल सर मुंबई, बीड जिल्हा सचिव पांढरे सर , नाशिक जिल्हा सचिव जोशी सर , नंदुरबार जिल्हा सचिव गावित सर यांनी संघाला मार्गदर्शन व प्रोत्साहित केले