Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ग्रामीण भागाच्या परंपरेच्या देखाव्याने वेधले महिलांचे लक्ष

 श्री शनैश्वर महिला मंडळाचा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न.


आपला ई पेपर परळी वै प्रतिनिधी

येथील तेली समाजाच्या श्री शनैश्वर महिला मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रतिवर्षी सामुदायिक हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा सोमवारी (ता.२०) श्री वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यास महिला भगिणींचा मोठा प्रतिसाद मिळाला.



 तेली समाजाच्या श्री शनैश्वर महिला मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा सोमवारी सायंकाळी ५ ते ९ यावेळेत श्री शनी मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला मंडळाने प्राचीन ग्रामीण भागाचा हुबेहूब जिवंत देखावा केला. यामध्ये विहीरीवर पाणी शेंदने, चुलीवर स्वयंपाक,जात्यावर दळण दळणे, ग्रामीण भागात शेतकरी महिला शेतात कामासाठी कशा पध्दतीने जातात, गावात मिळणारा ताजा भाजीपाला विक्री, बैलगाडी  आदि जिवंत देखावा सादर केला होता. हा देखावा पाहण्यासाठी व हळदीकुंकू घेण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। यावेळी श्री शनैश्वर महिला मंडळाच्या ५६ महिला सदस्यांनी एकत्र येवून हा कार्यक्रम आयोजित केला होता.