Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महेश अर्बन को.ऑप.बँकेच्या अध्यक्षपदी ओमप्रकाश सारडा यांची बिनविरोध निवड

 

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी



येथील महेश अर्बन को.ऑप.बँकेच्या अध्यक्षपदी ओमप्रकाश सारडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

बँकेचे मुख्य मार्गदर्शक व प्रवर्तक प्रा.टी.पी.मुंडे सर, उपाध्यक्ष जनार्धन गाडे, संचालक शिवरत्न मुंडे, कृष्णा लोंढे, प्रा.विजय मुंडे, आत्माराम कराड, मिराताई ढवळे, शोभाताई काकडे, प्रभाकर गवळी, संदिप टाक, भिसाराम राठोड आदींच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि.13/12/2024 रोजी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी एस.एन.कुलकर्णी, सहाय्यक निबंधक संतोष भंडारी यांनी काम पाहिले. सुचक म्हणून प्रा.टी.पी.मुंडे सर हे होते तर अनुमोदक जनार्धन गाडे यांनी केले. बँकेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली. अध्यक्षपदासाठी केवळ एक अर्ज आल्याने ओमप्रकाश सारडा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

ओमप्रकाश सारडा यांनी 1999 ते 2004 या काळात नगरसेवक व बांधकाम सभापती म्हणूनही परळी पालिकेचे काम केले आहे. माहेश्वरी सभेमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. बालाजी मंदिर, बाबारामदेव मंदिरचे संचालक म्हणूनही काम पाहत आहेत. तसेच घाटनांदूर येथील गुरुदास सेवा आश्रम ट्रस्टचे ते संचालक आहेत.

 सारडा यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम.उपाध्याय, सर्व कर्मचारीवृंद आदींनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे.