Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शरद पवारच्या जाहीर सभेला या पदाधिकाऱ्यांनीपाठ फिरवली


शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचाच फोटो नाही शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी शरद पवार च्या जाहीर सभेला पाठ फिरवली


आपला ई पेपर परळी प्रतिनिधी

परळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची परळी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

परळी मतदारसंघात महाविकास आघाडीत निवडणुकीपूर्वीच बिघाड पैसा तुतारीचा प्रचार घड्याळीचा अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. मतदानापूर्वीच मै बडा म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेकांना विचारात न घेता बॅनरवर फोटो टाकल्याचे खुलासाही फेसबुक सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 

 परळीत अनेक उदाहरणे समोर येत आहेत. याच अनुषंगाने आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये निवडणुकी अगोदरच बिघाड झाल्याचे चर्चा सर्वत्र आहे.असल्याचे दिसून येत आहे. परळीच्या महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या बिघाडामुळे आप्पाचा विषयच लई  गंभीर झाल्याची चर्चा सर्वत्र दिसून येत आहे.

परळी येथे आज दि 9 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता मोंढा मार्केट येथे शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मै बडा म्हणणारे कार्यकर्त्यांनी पवारांच्या सभेपूर्वीच गोंधळ घातला होता.. यातच शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांची सभा या मतदारसंघाला मिळाली मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मोट बांधण्यात समन्वयाचा मोठा अभाव असल्याचे दिसून आला.

 महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीतील बिघाडा संदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर या सभेच्या प्रसिद्धी पत्रकांमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो घेण्यात आलेला नाही.शिवसेना जिल्हाप्रमुखांचाही फोटो नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्या कोण्या पदाधिकाऱ्यांचे फोटो टाकण्यात आले आहेत ते पण त्यांना न विचारता टाकण्यात आल्याचे उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी फेसबुक पोस्ट करून जाहीर केले आहे.

 दरम्यान एकंदरीतच शरद पवार परळीत येण्याच्या आधीच महाविकास आघाडीतील बिघाड सध्या परळी चर्चेचा विषय आहे.