Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जरांगे पाटलांच्या या भूमिकेने महाराष्ट्राचा राजकारणात खळबळ ....

आपला ई पेपर 


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की,आमची मध्यरात्री ३ वाजेपर्यंत चर्चा सुरु होती. आम्ही १४ उमेदवार निश्चित केले होते. 

मात्र इतर समाजाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. मध्यरात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून कोणतीही यादी आलेली नाही. मित्रपक्षांनी उमेदवारांची नावं न पाठवल्याने उमेदवार घोषित केले नाही. आम्हाला एकाच जातीच्या आधारावर लढणं शक्य नाही. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही. एकाच जातीवर निवडणूक जिंकणे सोपं नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.


“कोणाला पाठिंबा देणार नाही”

विधानसभा निवडणुकीतून आम्ही माघार घेतलेली नाही. हा गनिमी कावा आहे. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज मागे घ्यावेत. महाविकासआघाडी असो किंवा महायुती असो, दोन्हीकडचे नेते सारखेच आहेत. त्यामुळे कोणाला पाठिंबा देणार नाही. तसेच कोणालाही निवडून आणा, असे देखील सांगणार नाही. आपण कुणाच्याही प्रचाराला, सभेला जायचं नाही, मतदान करायचं आणि मोकळ व्हायचं.