Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

⭐✨स्टार प्रचारक | धनंजय मुंडे विधानसभा निवडणुक- प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही मुंडे स्वतः ऐवजी अन्य उमेदवारांच्या प्रचारात


परळीकरांवर व कार्यकर्त्यांवर प्रचंड विश्वास

विधानसभा निवडणुकीत राज्यभरात घेतल्या 35 सभा परळीत मात्र एकही मोठी सभा नाही

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला सुरुवात केल्याननंतर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बहुतांश उमेदवार हे स्वतःच्या मतदारसंघातच सभा वगैरे आयोजित करून प्रचाराची सांगता करतात. मात्र कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी मात्र आज शेवटच्या दिवशी स्वतःच्या परळी मतदारसंघात थांबण्याऐवजी बाहेरील तीन उमेदवारांसाठी सभा घेतल्या.  

वेगवेगळ्या निवडणुकीत प्रमुख पक्षांचे नेते राज्यभर प्रचार करीत असले तरी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मात्र स्वतःच्या मतदार संघात थांबण्याकडे त्यांचा कल असतो, मात्र या गोष्टीला फाटा देत धनंजय मुंडे यांनी शेवटच्या दिवशी ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ देणे पसंद केले.

आष्टीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थ कडा येथे आयोजित सभेस वेळेत पोचता न आल्याने धनंजय मुंडे यांनी फोनवरून वरून आपले भाषण केले. तर पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. तर दुसरीकडे गेवराई तालुक्यातील उमापूर येथे महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचाराची सांगता धनंजय मुंडे यांच्या सभेने झाली. 

आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी स्वतःच्या परळी मतदारसंघाची धुरा मात्र धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर सोडली असून जनतेवर व कार्यकर्त्यांवर दाखवलेल्या या अपार विश्वासाचे कौतुक केले जात आहे. साहेब, तुम्ही निश्चिंत राहून बाहेर पक्ष्याच्या उमेदवारांचा प्रचार करा, परळी आम्ही सांभाळू, असा अनेक कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंना विश्वास दिला आहे.

दरम्यान या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सहा उमेदवारांसह  मुंबई, ठाणे, पुणे, आळंदी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, नांदेड, लातूर, बीड जिल्ह्यातील विविध मतदारसंघ, मुंब्रा कळवा, वांद्रे , कळवण, पारनेर, सिन्नर, अकोले, लोहा, अहमदपूर, माजलगाव, गेवराई, बीड  इत्यादी ठिकाणी जवळपास 35 सभा घेतल्या आहेत.  

स्वतःच्या परळी मतदारसंघात मात्र धनंजय मुंडे यांनी अत्यंत साधेपणाने प्रचार केला असून एकही मोठी सभा घेतली नाही किंवा बाहेरील एकही मोठ्या मान्यवर नेत्याला निमंत्रित केले नाही. 

भव्य आणि दिव्य कार्यक्रम आणि सभा म्हटले की परळीचे नाव नेहमीच चर्चेत असते. मात्र या परंपरेला फाटा देत धनंजय मुंडे यांनी अत्यंत साध्या पद्धतीने आपला प्रचार केला असून गर्दीच्या सभा टाळल्या आहेत.

भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे, माजी खासदार प्रितमताई मुंडे यांच्यासह मतदार संघातील काही गावात त्यांच्या संयुक्त प्रचार सभा झाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या