Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना आदिवासी कोळी राष्ट्रसंघाचा जाहीर पाठिंबा

 



महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बळीराजे वाघमारे यांची माहिती

आपला ई पेपर अंबाजोगाई प्रतिनिधी

जस जशी निवडणूक मतदानाची तारीख जवळ येत आहे तस तसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना विविध पुरोगामी पक्ष, संघटना यांचा पाठिंबा व समर्थन लाभत आहे. गुरूवारी आदिवासी कोळी राष्ट्रसंघाने जाहीर पाठिंबा दिला. असल्याचे पत्र व तशी माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बळीराजे वाघमारे यांनी दिली आहे.

आदिवासी कोळी राष्ट्रसंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बळीराजे वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात ताकद अधिक वाढली आहे. पाठिंबा पत्रात नमूद केले आहे की, राजेसाहेब देशमुख अधिकृत उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महाविकास आघाडी) महाविकास आघाडीच्या परळी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपणांस आमचा संपूर्ण समाज एकमताने जाहीर पाठिंबा देत आहे. आज गुरूवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी अनुसूचित जाती-जमाती संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि कोळी राष्ट्रसंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बळीराजे वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत समाजाच्या हितासाठी व सन्मानासाठी एकत्र येऊन समाजातील प्रतिनिधींनी सर्वानुमते आपणास समर्थन देण्याचा ठराव पारित केला. गेल्या अनेक वर्षांत समाजाला केवळ खोटी आश्वासने मिळाली, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी वारंवार समाजाला फसवले गेले. भुलथापांनी समाजाला दिशाभूल केली, मात्र आता आम्ही ठरविले आहे की, आमच्या समाजाचे खरे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला, म्हणजेच आपणास, संपूर्ण समर्थन द्यायचे आहे. आम्ही सर्वांनी ठरवले आहे की, "तुतारी वाजवणारा माणूस" या चिन्हावर बटण दाबून मोठ्या बहुमताने आपल्याला विजयी करायचे आहे. समाजाचा विश्वास आणि एकजुटीचे प्रतीक म्हणून आपणांस संपूर्ण पाठिंबा दिला जात आहे. आम्हाला विश्वास आहे. की, आपण आमच्या अपेक्षांची पूर्तता कराल आणि समाजाच्या समस्यांचे निराकरण करून खऱ्या अर्थाने समाजाची सेवा कराल. अशी अपेक्षा कोळी राष्ट्रसंघ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा अनुसूचित जाती-जमाती संघर्ष समितीचे अध्यक्ष बळीराजे वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.