Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना, राज्यपाल महोदयांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपावली

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल महोदयांकडे आपला राजीनामा सादर केला. 

राज्यपाल महोदयांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपावली 

काळजीवाहू मुख्यमंत्री आणि त्या संदर्भातल्या घटनात्मक तरतुदी

भारतीय राज्यघटनेनुसार काळजीवाहू मुख्यमंत्री असे कोणतेही पद अस्तित्वात नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री आणि नियमित मुख्यमंत्री यांचे संवैधानिक अधिकार समान आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्यास कार्यकारी यंत्रणेत सातत्य रहावे व नवीन मुख्यमंत्री कार्यभार स्वीकारेपर्यंत कारभार सुरळीतपणे हकता यावा यासाठी राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा आदेश वजा विनंती केली जाते. अशा प्रकारची विनंती संबंधित राज्याचे राज्यपाल करत असतात.

 भारतीय राज्यघटनेच्या कलम 166 अन्वये राज्य शासनाची कार्य नियमावली म्हणजेच शासनाने कामकाज कसे पार पाडावे याचे नियम बनवलेले असतात. त्या नियमात देखील नियमित मुख्यमंत्री व काळजीवाहू मुख्यमंत्री तसेच नियमित मंत्रिमंडळ व काळजीवाहू मंत्रिमंडळ यांच्या अधिकारांमध्ये भेदभाव केलेला नाही. म्हणजेच कार्य नियमावली मधील ( रुल्स ऑफ बिझनेस ) तरतुदीनुसार त्यांना समान अधिकार असतात.

तथापि अशाप्रकारे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची विनंती करत असताना संबंधित राज्याचे राज्यपाल संबंधितांना दरम्यानच्या काळात मोठा अथवा धोरणात्मक निर्णय न घेण्याबाबत सूचना देत असतात.