Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावे- राजेसाहेब देशमुख

आपला ई पेपर /online अंबाजोगाई प्रतिनिधी  




परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारसंघाच्या विकासासाठी जातीपाती आणि  धर्मावर आधारित मतदान न करता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावे असे आवाहन धासरवाडी येथे मतदार बंधू-भगिनींना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते ऍड.माधव आप्पा जाधव यांच्यासह धारवाडी येथील युवक जेष्ठ नागरिक मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी मतदारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख म्हणाले की, परळी विधानसभा मतदारसंघातील धासरवाडी येथील नागरिकांच्या आणि मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने चर्चा केली. विरोधक येऊन फक्त जातीपातीच्या आधारावर भावनात्मक करतील. कारण त्यांना विकासचं, बेरोजगारीचे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभावचं काहीही घेणंदेणं नाही. आपणही सर्वसामान्य जनतेने आता त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शांत बसायचं नाही. असेही ते म्हणाले.