Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माजी मंत्री धनंजय मुंडे | आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने..

 आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 









*प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी धनंजय मुंडेंनी परळीतल्या व्यापारी बांधवांसोबत केले लक्ष्मीपूजन साजरे*


*परंपरेनुसार पायी सर्व व्यापारपेठेत मुंडेंची भेट, व्यापारी बांधवांना दिल्या शुभेच्छा*


*बहरती व्यापरपेठ व वाढते उत्पन्न पाहून आनंदी - धनंजय मुंडे*


परळी वैद्यनाथ (दि. 01) - कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मागील अनेक वर्षांपासून जपलेल्या परंपरेनुसार आज आपले लक्ष्मीपूजन परळी वैजनाथ शहरातील व्यापार पेठेतील सर्व व्यापारी बांधवांसोबत साजरे केले. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत चालत सर्व व्यापार पेठ पिंजून काढत परळी शहरातील विविध व्यावसायिक बांधवांना त्यांच्या व्यवसायाच्या स्थळी भेट देऊन धनंजय मुंडेनी लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा दिल्या. 


परळी हे विकसनशील शहर आहे. बहरती व्यापारपेठ आणि वाढलेला उद्योग पाहून तसेच व्यावसायिक क्षेत्रात आलेली आधुनिकता पाहून प्रसन्नता वाटते, प्रबोधनाथांच्या कृपेने या मातीतील व्यवसायिकांच्या आणि नागरिकांच्या उत्पन्नात अधिकाधिक भर पडत राहो, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.


यावेळी युवक नेते अजय मुंडे, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत नाना मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, दीपक नाना देशमुख, जयपाल लाहोटी, रामेश्वर मुंडे, प्रा मधुकर आघाव, श्री देशमुख, डॉक्टर संतोष मुंडे, जयप्रकाश लड्डा, सुरेश मुंडे, गोविंद फड यांसह व्यापारी बांधव उपस्थित होते.



प्रतिवर्षीप्रमाणे परळी शहरातील व्यापारी पेठेत जाऊन सर्व व्यापारी बांधवांना दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा दिल्या...

#दीपावली #लक्ष्मीपूजन #परंपरा# सर्वांसोबत_सर्वांसाठी