Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI I लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयास नॅक ' चा 'बी' दर्जा प्राप्त


परळी वैजनाथ दि.३१ प्रतिनिधी

      येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयास 'नॅक' चा 'बी ' दर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाने 'नॅक'च्या मूल्यमापनात तिसऱ्यांदा हे घवघवीत यश प्राप्त केले आहे. तृतीय मूल्यमापनासाठी ' नॅक' च्या त्रिसदस्यीय समितीच्या तज्ज्ञांनी दि २२ व २३ऑक्टोबर  रोजी महाविद्यालयास भेट दिली होती.

    या समितीत डॉ जितेनकुमार सोनी ( माजी कुलगुरु सौराष्ट्र विद्यापीठ , गुजरात) हे समितीच्या अध्यक्षस्थानी होते तर डॉ.वासंती ताटिमाकुला (योगी वेन्नम्मा विद्यापीठ कडापा,आंध्रप्रदेश) व डॉ . पार्वती रुद्रप्पा(व्ही इ टी फर्स्ट ग्रेड  कॉलेज,बेंगलोर - कर्नाटक ) यांनी सदस्या म्हणून काम 

पाहिले.त्यांच्या या दोन दिवसीय  भेटीत त्यांच्याद्वारा महाविद्यालयातील विविध विभागांची तपासणी केली गेली.त्यात महाविद्यालयाने राबविलेले विविध उपक्रम , समाजोपयोगी घेतलेली भूमिका ,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य,कार्यालयीन कामकाज,ग्रंथालय,प्रयोगशाळा अशा विविध विभाग कार्याचे मूल्यमापन केले .

      महाविद्यालयातील विविध विभाग ,विविध मंडळे - भाषावाङ्मय मंडळ , विज्ञान मंडळ , सामाजिकशास्त्रे मंडळ , राष्ट्रीय सेवा योजना विभाग , क्रीडा विभाग , परीक्षा विभाग, विद्यार्थिनी कल्याण विभाग,य.च.म.मु.विद्यापीठाचे अभ्यासकेंद्रासह महाविद्यालयात कार्यरत असलेल्या विविध क्लब कार्यांचीही त्यांनी भेट देऊन माहिती घेतली होती. याबरोबरच महाविद्यालयांमध्ये माजी 

विद्यार्थिनी मेळावा , पालक मेळावा घेऊन यांत पालक व माजी विद्यार्थिनींशीही या कमिटीने संवाद साधला होता. शिवाय सध्या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थिनींसोबत त्यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून संवाद साधून त्यांचे मनोगत ऐकून घेतले होते. सांस्कृतिक कार्यक्रम , संशोधनपर कार्य या सर्वांची योग्य ती दखल घेऊन 'नॅक' मूल्यमापन समितीने महाविद्यालयास नॅकचा 'बी' दर्जा प्रदान केला आहे.ही महाविद्यालयाच्या उन्नतीसाठी आनंदाची बातमी आहे.संस्थेचे 

संस्थापक अध्यक्ष स्व. श्यामरावजी देशमुख यांच्या स्वप्नाला मूर्त रूप देण्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक कामगिरी करत महाविद्यालयाने 'नॅक 'चा 'बी' दर्जा प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा.अनिलरावजी देशमुख,संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मा.संजयजी देशमुख , मा.सचिव रवींद्रजी देशमुख, कोषाध्यक्ष मा.प्रा. प्रसाद देशमुख,संचालिका मा.विद्याताई अनिलराव 

देशमुख मा.छायाताई देशमुख व इतर संचालक मंडळाने व महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा संस्थेच्या संचालिका डॉ.विद्याताई देशपांडे तसेच महाविद्यालयीन अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे समन्वयक,डॉ.शिवनारायण वाघमारे यांच्याबरोबरच सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.यावेळी बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विद्याताई देशपांडे यांनी या पुढेही सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक दृष्टीने उच्चतम भूमिका पार पाडण्याचा मनोदय व्यक्त केला.