अनुभवी कराड यांच्या दाव्यामुळे पवार गटास सक्षम चेहरा सापडला
आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
परळी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असुन या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडुन उमेदवारीवर दावा ठोकत विधानसभा निवडणुकीसह,जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका,ग्रामपंचायत अशा सर्व निवडणुकांच्या निमीत्ताने परळी मतदार संघात कायम चर्चेत राहिलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) जेष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दावा ठोकत शरद पवार साहेबांनी मला संधी दिली तर या निवडणुकीत मी धनंजय मुंडे यांचा सहज पराभव करुन परळी विधानसभेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास पत्रकार परिषदेत केला.
परळी विधानसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडुन उमेदवारीचा दावा ठोकताना जेष्ठ नेते फुलचंद कराड यांनी सांगितले की,मी स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्याविरुध्द परळी विधानसभा निवडणुक लढवुन 65 हजार मते घेतली होती.दादाहरी वडगाव जि.प.गटातुन विजयी झालो होतो.वैद्यनाथ साखर कारखान्याच्या उभारणीत माझा सिंहाचा वाटा असुन उपाध्यक्ष पदावर काम करत साखर कारखाना उत्तम स्थितीत चालवला.शेतकर्यांच्या ऊसाबरोबरच स्थानिकांना रोजगार मिळवुन दिला.राज्य परिवहन महामंडळाचे सदस्य असताना असंख्य बेरोजगारांना एस.टी.महामंडळात नोकर्या लावल्याने मला नौकरीवाला बाबा म्हणुन संबोधले जायचे.परळी औष्णीक वीजनिर्मिती केंद्राच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हातावर घेवुन आंदोलन केले.शिक्षण संस्था काढुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच अनेकांना नौकरी दिली.जवाहर एज्युकेशन सोसायटीमध्ये सतत निवडुन येत उपाध्यक्षपद भुषविले आहे.1980 ते 2019 पर्यंत जिल्हा परिषद,नगरपालिका,विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रचारप्रमुख म्हणुन परळी विधानसभा मतदार संघाची धुरा सांभाळली.माझे गाव असलेले लिंबोटा ग्रामपंचायत गत 35 वर्षांपासुन माझ्या ताब्यात असुन यात पाच वेळा बिनविरोध आलेली आहे.परळी शहरातील भारनियमनाचा प्रश्न,शेतकर्यांना ट्रान्सफार्मर उपलब्ध करुन देणे,वाण धरणातील पाणी शेतीसाठी सोडणे,पिकविमा,नुकसान भरपाईसाठी लढा,परळी शहर स्वच्छ रहावे व पिण्याचे पाणी मिळावे यासाठी उपोषण केले.परळी तालुक्यातील महत्वाचा रस्ता असलेल्या परळी- बीड रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे होत असलेल्या कामाविरोधात आंदोलन केले यामुळे माझी गावागावात असलेली ओळख कायम असुन मी प्रत्येकाला व्यक्तीगत ओळखतो.याबरोबर मी गत 15 वर्षांपासुन दुर्गोत्सवांच्या माध्यमातुन सांस्कृतिक वारसा जपण्याचे,आळंदी-पंढरपुर माऊली सोहळ्यात सहभाग असतो.माझ्या या सर्व कार्यामुळे मला निवडणुकीच्या तोंडावर बॅनर लावण्याची अथवा ओळख करुन देण्याची गरज नसुन जनसेवेचे हे व्रत करत असताना घरावर तुळशिपात्र ठेवुन निस्वार्थ भावनेने हे कार्य करत आहे.यामुळे या विधानसभा निवडणुकीत शरद पवार साहेबांनी मला संधी दिली तर निश्चितच मी धनंजय मुंडे यांचा पराभव करुन परळी विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकावणार असल्याचा विश्वास फुलचंद कराड यांनी या पत्रकार परिषदेत केला.
Social Plugin