Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी जिल्हा स्तरावरील बुध्दीबळ स्पर्धेत निवड

 



परळी वैजनाथ प्रतिनिधी

          येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी स्नेहा हमिने ही बीड जिल्हा झोन आंतर महाविद्यालयीन बुध्दीबळ निवड चाचणीत पहिला क्रमांक पटकावला असून तीची विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय संघात निवड झाली आहे.

          डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व नवगण महाविद्यालय परळी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा झोन आंतर महाविद्यालयीन बुध्दीबळ स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन गुरुवारी (ता.१०) करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय निवड चाचणीत लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहा हमिने हीने पहिला क्रमांक पटकावला असून तिची विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय संघात निवड झाली आहे. या विद्यार्थिनीला महाविद्यालयातील क्रिडा संचालक प्रा डॉ प्रविण दिग्रसकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.