Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

६०० ‘लेकी’च्या |Lek Ladki Yojana Pahila Hafta| खात्यावर पहिला हप्ता ५०००/₹ मिळणार

|Lek Ladki Yojana Pahila Hafta|आपला ई पेपर 



‘लेक लाडकी’ योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी प्रती लाभार्थी ५ हजाराप्रमाणे ३१८ मुलींच्या संयुक्त बँक खात्यात वळते करण्यात आले आहे. लवकरच ६०० मुलींनाही योजनेतील पहिल्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजवर तीन हजारांहून अधिक पालकांनी महिला व बाल कल्याण विभागाकडे अर्ज सादर केले असून, पहिल्या हप्त्याची अर्थात पाच हजारांची रक्कमही ३१८ जणींच्या खात्यावर जमा झाली. तर ६०० ‘लेकी’च्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

राज्य शासनाकडून एक एप्रिलपासून ही योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतील लाभाची रक्कम लाभार्थ्यांना ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डीबीटी)द्वारे थेट बँक खात्यात देण्यात येत आहे. १ एप्रिल २०२३ नंतर एक मुलगी व मुलगा आहे.

त्यांना ही योजना लागू आहे. यासह ज्यांना एकच मुलगी आहे. दोन्ही मुली आहेत, असे कुटुंबीय या योजनेस पात्र ठरणार आहेत. या ‘लेक लाडकी’ योजनेची ग्रामीण भागात लाभार्थींची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका, नागरी भागात मुख्य सेविकांची आहे. योजनेतील लाभार्थ्यांना योजनेचा पहिला ५ हजारांचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाला ५० लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. यातून सुमारे एक हजार पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या वितरणाचे नियोजन विभागाचे आहे.

 Lek Ladki Yojana Pahila Hafta

या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना त्यांच्या कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळतील. मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये मिळतील. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख १ हजार रुपये मिळतील.

‘लेक लाडकी’ योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी प्रती लाभार्थी ५ हजाराप्रमाणे ३१८ मुलींच्या संयुक्त बँक खात्यात वळते करण्यात आले आहे. लवकरच ६०० मुलींनाही योजनेतील पहिल्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या