Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Accident | परळी आंबेजोगाई रस्त्यावरील अपघातात एक महिलेचा मृत्यू

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 


परळीतील वैद्यनाथ महाविद्यालय समोरील रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाचाअंदाज न आल्याने रात्री 10.30वा. च्या सुमारास भरधाव वेगातील एक ऑटो रिक्षा या गतिरोधक वर पलटी होऊन अपघात झाला. यात एक महिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

अंबाजोगाई कडे जाणारा ऑटो पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये अलका काकासाहेब सूर्यवंशी (वय 40) रा. अंबाजोगाई या महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्रडॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

ही महिला परळीत एका कपड्याच्यादुकानात कामाला होती. दिवसभराची काम आटपून ती रात्रीच्या वेळी आंबेजोगाई कडे जाण्यास एसटी बस नसल्यामुळे रात्री 10.30 वा.च्या सुमारास ऑटो रिक्षाने आंबेजोगाई कडे जात होती.तेव्हा हा अपघात झाला. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या गतिरोधकामुळे याआधी अनेकअपघातात लोकांना गंभीर दुखापत झालेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या