Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

CBSE|सीबीएसईच्या 10 व 12 वी परीक्षेत सिंदफणा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

100 टक्के निकालाची परंपरा कायम


आपला ई पेपर माजलगाव प्रतिनिधी

येथील विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूलच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करून १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. 

सविस्तर वृत्त असे की, मार्च- एप्रिल २०२४ दरम्यान सीबीएसई कडून दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये सिंदफणा पब्लिक स्कूलच्या दहावीतील एकूण १०० विद्यार्थ्यांनी  ही परीक्षा दिली. यापैकी अलेक रेदासानी हा विद्यार्थी ९८ टक्के गुण घेऊन शाळेतून पहिला आला. तर वेद कलंत्री याने ९७.२० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच जान्हवी रुद्रवार या विद्यार्थिनीने ९६.२० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला. या निकालाची विशेष बाब म्हणजे २२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले.   संस्कृत विषयात विक्रमी ३३ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले तर माहिती तंत्रज्ञान विषयात तीन तर गणित या विषयात एका विद्यार्थ्याने पैकीच्या पैकी गुण मिळविले. बारावी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून एकूण सहा विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली. यापैकी  आर्यन डाके या विद्यार्थ्याने ८३.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. ओजस्वी बजाज या विद्यार्थिनीने ८३.२० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला.  तसेच पृथ्वीराज माने या विद्यार्थ्याने ७८ टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला. शाळेच्या बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षी देखील शाळेने कायम राखली आहे. 

 या घवघवीत यशासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष वीरेंद्र सोळंके, शाळेच्या सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम तसेच सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या