Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत अजब गजब..अतिक्रमणाच्या अजगराने गिळंकृत केला दहा फुटाचा नाला... चौकशी मागणी

 गुत्तेदारचा चमत्कार दहा फुटाच्या नालाची,तीन फुटात रुपांतर 

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी

 परळी शहरात तिर्थक्षेत्र विकास योजनेतुन वैद्यनाथ मंदिर परिसरातील मेरुगिरी रस्त्याच्या उभारणीचे काम गत सहा महिन्यापासुन सुरु आहे.सध्या हा रस्ता उखडुन टाकलेला असुन या रस्त्यामध्ये बसवेश्वर कॉलनीतुन येणार्या नाल्याची रुंदी कमी करुन तीन फुटाची नाली बांधण्यात आली आहे.

अगोदरच अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या या रस्त्यावरच्या नालीमुळे वाव मिळाला असुन नालीमुळे परिसरास पुराचा धोका निर्माण झाला आहे.

 बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीच्या वैद्यनाथ मंदिर परिसराचा तिर्थक्षेत्र विकास योजनेतुन विकास करण्यात येत आहे.यामध्ये मेरु प्रदक्षिणा मार्गाचा समावेश असुन या रस्त्याचे सहा महिन्यापुर्वीच काम सुरु झाले आहे.

महाशिवरात्र यात्रेवेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे  यांनी हा रस्ता तात्काळ पुर्ण करावा अशा सुचना देवुनही रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे.सध्या हा रस्ता पुर्णपणे उखडुन टाकलेला आहे.रस्त्याच्या बाजुच्या नाली उभारणीचे काम सुरुच आहे.या रस्त्याला इमदादुल उर्दु माध्यमिक शाळेजवळ बसवेश्वर कॉलनीतुन येणारा नाला मिसळत आहे.या नाल्याची नैसर्गिक रुंदी दहा फुटापेक्षा अधिक असतानाही जास्त पाऊस झाला तर बसवेश्वर कॉलनी,बाजीप्रभु नगर,नगरेश्वर भागातील घरामध्ये पाणी शिरते.तिर्थक्षेत्र विकास योजनेतून या ठिकाणी नाली बांधण्यात येत आहे.

पुर्वीची दहा फुटाची रुंदी या नविन नालीमुळे तीन फुटाची झाली आहे. यामुळे धोका आणखीच वाढणार आहे. नैसर्गिक नाल्याची जागेत अनेकांचे अतिक्रमण करून मोकळी झाली आहेत.

 नैसर्गिक रुंदी कायम ठेवावी

 बसवेश्वर कॉलनीतुन परळी शहरात येणार्या नाल्याच्या भोवती अगोदरच अतिक्रमण झालेले आहे.सध्या हा नाला दहाफुटाचा असुन नाली बांधकामामुळे तीन फुट झाली आहे.या नाल्याची नैसर्गिक रुंदी कायम ठेवुन नाली बांधकाम करावे व अजुबाच्या अतिक्रमण धारकांनी केलेले अतिक्रमण मोजणी करुन काढुन टाकावे

 - प्राचार्य अतुल दुबे

 परळी वैजनाथ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या