Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कौतुकास्पद |परळीत लोकसभा निवडणुकीत राजकारणासोबत सामाजिक कार्याचा सलोखा


आपला ई पेपर | परळी प्रतिनिधी      

राजकारणात अनेकांचे इगो आणि शायनिंग हे सतत चर्चांचे विषय आहे परंतु राजकारण सोबतच समाजकारण  करणारे सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांच्या माध्यमातून या लोकसभा निवडणुकीत सायकल रिक्षावाल्या गोरगरीब रिक्षा चालकांना सतत दहा दिवस उपजीविका म्हणून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला होता हे कौतुकास्पद अश्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 



बीड लोकसभा निवडणूकीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी ६ वाजता थंडावला. मात्र गेले ४० ते ४५ दिवस लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. यामध्ये उमेदवारांनी दुर्लक्षित असलेले सायकल रिक्षावाले यांना प्रचारासाठी लावले होते. यामुळे त्यांना १५ दिवस रोजगार उपलब्ध झाला होता.    

लोकसभा निवडणूक म्हटले की, संपूर्ण जिल्ह्यात उमेदवारांना मतदारापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहचावे लागते. उमेदवारांचे नाव ,निवडणूक चिन्ह यासाठी प्रचार मोहीम राबविण्यात येते. या प्रचार मोहिमेसाठी विविध नेत्यांच्या प्रचारसभा, सोशलमिडीयाचा वापर, रिक्षा, गाड्या आदिंचा वापर केला जातो.

 या माध्यमातून अनेक नागरीकांना रोजगार मिळत असतो. ३० वर्षापूर्वी दळवळणाची साधने उपलब्ध नव्हती. त्यावेळी घोडागाडी, बैलगाडी पुढे सायकल रिक्षाचा वापर गावातल्या गावात प्रवासासाठी होवू लागला. विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात हे सर्व पाठीमागे पडले. अँटोरिक्षा, आता विजेवरील रिक्षा, गाड्या आलेल्या आहेत. यामुळे सायकल रिक्षा व चालवणारे व्यवसाय होत नसल्याने त्यांचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. सध्या इतरवेळी सायकल रिक्षा चालकांना रोजचे १०० रुपये मिळणेही दुरापास्त झाले आहे.

 सायकल रिक्षा चालकावर उपासमारीची वेळ आली आहे. कारण आता कोणी सायकल रिक्षामध्ये प्रवासही करत नि. मिळाले तर लोडींग भाडे मिळत आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कमी झालेल्या सायकल रिक्षा चालकांना प्रचारासाठी वापरण्यात आले. यांना किमान गेले १५ दिवस तरी रोजगार उपलब्ध झाला. प्रचारसाठी सायकल रिक्षा चालकांची पळवापळवी झालेली दिसून आली. या काळात काही उमेदवारांनी प्रचारासाठी रिक्षा मिळणे कठीण झाले होते. प्रचारासाठी या सायकल रिक्षा चालकांना ७०० ते ८०० रुपये रोजगार मिळाला. यामुळे किमान १५ दिवसतरी रोजगार उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे.

-----------------------------------------------

  यासंदर्भात सायकल रिक्षा चालक कोंडीराम शिंदे म्हणाले की, आमची सध्या अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे आम्हच्या हाताला काम मिळाले. गेल्या १५ दिवसात ७०० रूपये रोज मिळाला. इतरवेळी कोणी प्रवाशी आमच्या रिक्षाने प्रवास करत नाही तर सामानचे काही भाडे मिळाले तर दिवसात कधी १०० तर कधी ३०० रुपयांपर्यंत रोजगार मिळत आहे. परिस्थिती नसल्याने इंजिनवरचे वाहन खरेदी करता येत नाही. शासनाने काही योजना काढून  इतर व्यवसायासाठी आर्थिक मदत करावी.

सायकल रिक्षा चालक 

कोंडीराम शिंदे

----------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या