Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीच्या अग्निशमन रेस्क्यू टीममुळे बुडलेल्या तरूणांचा सापडला मृतदेह

|आपला ई पेपर |केज प्रतिनिधी|


तालुक्यातील जिवाचीवाडी येथे तलावात मासे पकडायला गेलेल्या एका (३४) वर्षीय तरुणाचा जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली होती. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता मृतदेह सापडलेला नव्हता.


दरम्यान दुसऱ्या दिवशी परळी येथील  रेस्कयू टीमचे अग्निशमनदल विभाग प्रमुख सुनील नारायणराव आदोडे, फायरमन नितीन जगतकर ,निखिल वाघमारे या परळीच्या टीमला त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे

.

अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील नितीन मच्छिंद्र काळे (वय ३४ वर्षे) हा तरुण मुंबई येथे राहत असून काही दिवसांपूर्वी तो धार्मिक कार्यासाठी गावात आला होता. त्या नंतर गुरुवार दि. २३ मे रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास तो जिवाचीवाडी येथील गावालगतच्या तलावात मासे धरण्यासाठी गेला होता, मात्र त्याला पाण्याचा आणि मासेमारीसाठी तळ्यात टाकलेल्या जाळ्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती व तपास केज पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या