Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

| परळीत उष्माघाताने आठवडी बाजारातील भाजी विक्रेत्याचा मृत्यू | कुटुंबाचा आधार गेला

आपला ई पेपर|| परळी |प्रतिनिधी@


परळी तालुक्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे.उन्हाच्या तीव्रता व वाढलेले तापमान लक्षात घेता उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. मात्र हातावर पोट असणाऱ्या लोकांना उन्हात काम केल्याशिवाय गत्यंतरच नाही.यातूनच परळीच्या आठवडी बाजारातील एका भाजीविक्रेत्यावर काळाने घाला घातला असुन उष्माघाताने त्यांचा बळी गेला आहे.

परळी तालुक्यातील दैठणा घाट येथील महादेव संभाजी गुट्टे (वय 54) वर्ष हे अल्पभूधारक शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला उत्पादित करून आठवडी बाजारात हातावर भाजीपाला विकतात. आज सोमवार रोजी आठवडी बाजारात नेहमीप्रमाणे भाजी विक्रीसाठी हे शेतकरी बसले होते.सकाळपासूनच उन्हाचा कडाका होता. परळीत दुपारच्यावेळी तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअस इतका वाढलेला होता. उन्हाची प्रचंड तीव्रता वाढलेली असल्याने भरदुपारी उष्माघाताचा जबर फटका या भाजीविक्रेत्याला बसला आणि भर बाजारातच उष्माघाताने भोवळ येऊन ते पडले. आजूबाजूच्या लोकांनी उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय परळी येथे आणले. मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा  मृत्यू झाला. 

परळीत उष्माघाताने मृत्यू  झालेले महादेव संभाजी गुट्टे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली अशा परिवाराची उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारीच महादेव गुट्टे यांच्यावर होती. मात्र घरातील कर्ता माणूसच गेल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या