Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पोदार लर्न स्कूलची कु.महिका गुरूप्रसाद देशपांडे सीबीएसई दहावी परीक्षेत परळी तालुक्यातून प्रथम


सीबीएसईच्या दहावी परीक्षेत राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश ; 100 टक्के निकालाची परंपरा कायम

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
परळी येथील राजस्थानीज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राजस्थानीज पोदार लर्न स्कूल दहावीची कु. महिका डॉ. गुरुप्रसाद देशपांडे या विद्यार्थीनींने 97.6 टक्के गुण घेऊन परळीत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नुकत्याच झालेल्या 2023-2024 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. कौतुकास्पद, मराठी विषयात 100 पैकी 100 गुण घेऊन निकालाची परंपरा कायम राखली आहे. मार्च- एप्रिल 2023-2024 दरम्यान सीबीएसई कडून दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनीने ही परीक्षा दिली होती.

यापैकी कु. महिका डॉ. गुरुप्रसाद देशपांडे या विद्यार्थीनींनी 97.6 टक्के गुण घेऊन परळीत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या निकालाचे विशेष बाब म्हणजे 21 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षी देखील शाळेने कायम राखली आहे.

या घवघवीत यश मिळविल्यामुळे शाळेचे अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग, प्राचार्य मंगेश काशीद , उपप्राचार्य श्री.लक्ष्मण पाटील, परीक्षा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर गुठ्ठे  व  शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या