Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे सौ.स्वाती पांढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी







महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आज बुधवार दि. १ मे २०२४ रोजी सकाळी राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे शाळेतील शिक्षिका सौ. स्वाती पांढरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.

महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हौतात्म्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूलचे अकॅडमी डायरेक्टर बी पी सिंग यांनी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. शिल्पा गायकवाड यांनी केले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिक हौतात्म्यां यांच्या संपूर्ण जीवन चरित्रावर त्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मंगेश काशीद सर, उप मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील सर, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आदींच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली

यावेळी शाळेचे अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग, प्राचार्य मंगेश काशीद , उपप्राचार्य श्री.लक्ष्मण पाटील  व  शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या