Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

केज येथे झालेल्या अपघातात परळीतील एका महिलेचा मृत्यू ठार

आपला ई पेपर केज प्रतिनिधी


चिंचोलीमाळी वरुन केज येथे आलेला रिक्षा अचानक पलटी होऊन घडलेल्या अपघातात एक महिला ठार तर एक जखमी झाल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळच अंतरावर कळंब रोडवर आज शनिवारी दुपारी घडली आहे.

कमल मिठु शिंदे (वय ६० वर्ष) रा. परळी असे मयत महिलेचे नाव आहे. कमल या बहीणीच्या पतीचे निधन झाल्याने सावडण्यासाठी चिंचोलीमाळी (ता. केज) येथे आल्या होत्या. सावडणे झाल्याने त्या परळी येथे जाण्यासाठी चिंचोलीमाळी येथून एका टमटममध्ये बसून केजपर्यंत येत होत्या.

 हा टमटम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावर आला असता अचानक पलटी झाला. टमटम पलटी होताच कमल शिंदे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यांच्यासह एक जण जखमी असून त्यांचे नाव मात्र समज शकले नाही.


*भिषण अपघात..दोन नेत्यांचा मृत्यू ब्रेकखाली बिअरची बॉटल अडकल्यामुळे अपघात..*

🔴👇👇💥🔴 |
*https://aplaepaper.blogspot.com/2024/04/blog-post_81.html*

🫀🫀आता परळीत सुद्धा उपलब्ध..

*🔴💥👇👇👇🫀
*सुपर स्पेशालिस्ट,*
*डॉ.हर्षद चिपडे*
*(Mch.Neurosurgery, AIIMS New Delhi)*

*शनिवार,दि.,१३ एप्रिल २०२४* रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
या वेळेत परळी येथे रुग्णांच्या तपासणी करिता..
*अनन्या हॉस्पिटल,जुन्या कोर्टासमोर बस स्टँड जवळ परळी* येथे उपलब्ध आहेत.

यापुढेही प्रत्येक महिन्याच्या..
*दुसऱ्या व चौथ्या शनिवारी डॉ.हर्षद चिपडे हे 'अनन्या हॉस्पिटल', परळी* येथे नियमित उपलब्ध राहतील.

अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क :
*7741997019*

(Advt.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या