Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गाढे पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

 आपला ई पेपर परळी प्रतिनिधी   


तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे गेल्या १५५ वर्षांची परंपरा असलेला ग्रामदैवत श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त सोमवार (ता.२९) पासून रविवारी (ता.०५) पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिव कथेचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्यास सहभागी होण्याचे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दिडशे वर्षांची परंपरा असलेला श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्या निमित्त सोमवार पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिव कथेचा प्रारंभ होत आहे. या हरिनाम सप्ताहात सोमवारी संतोष महाराज सोळंके, मंगळवारी महादेव महाराज चाकरवाडीकर, बुधवार गोविंद महाराज धोत्रे आळंदी, गुरुवारी अंकिता माने आळंदी, शुक्रवारी कालीदास महाराज अवलगावकर, शनिवारी कृष्णदास महाराज सताळकर,प्रभाकर महाराज झोलकर यांचे काल्याचे किर्तन रविवारी १२ ते २ होणार आहे. रोज पहाटे काकडा आरती,७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी अंकिता खांडगे यांची १ ते ५ शिव कथा, सायंकाळी ६ ते ७ धुप आरती होणार आहे. 


तर मुख्य पालखी सोहळा रविवारी (ता.०५) रात्री १२ वाजता श्री.पापदंडेश्वर मंदिरातून निघणार असून रात्री पालखी मार्गावर भारुडे, सकाळी गवळणी व मंगळवारी दुपारी महाआरती नंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. या पालखी सोहळ्यास व अखंड हरिनाम सप्ताहास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या