Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

डॉ.गणेश चंदनशिवे यांना आयडियल टीचरफॉर परफॉर्मिंग फोल्क आर्ट्स आंतरराष्ट्रीय सन्मान

 आपला ई पेपर मुंबई 


स्वराज्य वेलफेअर असोसिएशन मुंबई यांच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख तथा सिने पार्श्वगायक डॉ. गणेश चंदनशिवे यांना आयडियल टीचरफॉर परफॉर्मिंग फोल्क आर्ट्स या आंतरराष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले.

या सत्काराला उत्तर देतांना डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले की,ज्यांच्या संकल्पनेतून मुंबई विद्यापीठात लोककला अकादमी सुरू झाली.

 आणि ज्यांच्या कृपाआशिर्वादाने माझे तिथे सिलेक्शन झाले. ते तत्कालीन कुलगुरू नियोजन आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार अर्थशास्त्र आणि आंबेडकरी तत्वज्ञानाचे अभ्यासक प्रा. भालचंद्र मुणगेकर सर ,तत्कालीन प्र. कुलगुरू प्रा. अरुण सावंत यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील "आदर्श शिक्षक (आयडियल टीचरफॉर परफॉर्मिंग फोल्क आर्ट्स" )या पुरस्काराने सन्मानित झालो. ही माझ्यासाठी एक खूप मोठी पर्वणी होती. माझे कार्याचे  भरभरून कौतुक त्यांनी केले. आज खरी पावती मिळाली.

असे उद्गार त्यांनी या प्रसंगी बोलतांना काढले.

गेली अनेक वर्षे ते लोककला  माध्यमातून सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्नांविषयी लोकरंजनातून लोकजागृती करण्याचे कार्य करत  आहेत. सामाजिक प्रश्नांवर भारतीय लोककला व सांस्कृतिक चळवळीतून लोककलावंत म्हणून ते प्रबोधन करत असून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. 

या सन्मान सोहळ्यात तत्कालीन कुलगुरू नियोजन आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार अर्थशास्त्र आणि आंबेडकरी तत्वज्ञानाचे अभ्यासक प्रा. भालचंद्र मुणगेकर सर ,तत्कालीन प्र. कुलगुरू प्रा. अरुण सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त लोककलावंत संशोधक  डॉ.गणेश चंदनशिवे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या