Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संताच्या केवळ आरत्या गावू नका-विचारांचे आचारण करा भारत महराज जाधव यांचे आवाहन

 


शेतकरी कीर्तन महोत्सव नवी अध्यात्मिक चळवळ-ह.भ.प. राजाभाऊ महाराज चोपदार

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी

शेतक-यांना केंद्र स्थानी ठेऊन आयोजिलेला कीर्तन महोत्सव ही नवी आध्यात्मिक चळवळ ठरेल. शेतक-यांच्या अध्यात्मिक उन्नतीबरोबर त्यांच्या मानसिक, शारीरिक आरोग्याची काळजी या कीर्तन महोत्सवातून घेतली जात आहे, हे एक क्रांतीकारी पाऊल आहे,  असे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ यांनी केले.

जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवाच्या निमित्ताने धारुर तालुक्यातील कान्नापूर येथे दुस-या शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी राजाभाऊ महाराज बोलत होते. पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महराज जाधव हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजाभाऊ महाराज चोपदार पुढे म्हणाले की,  शेतकरी आणि वारकरी एकच आहेत. 

दोघांनाही संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष सुसह्य व्हावा यासाठी हा कीर्तन महोत्सव आहे. सध्या वारकरी संप्रदायात वैचारिक भेसळ होत आहे. खरं तर वारकरी कोणत्याही एका जातीचा किंवा धर्माचा नाही. परंतू सध्या धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे. धर्मा धर्मात तेढ निर्माण केला जात आहे. अशा वेळी विवेकी वारक-यांनी अशा कोणाचाही द्वेष करू नये. आपला संघर्ष हा सत्य विरुध्द असत्य, निती विरुध्द अनिती असा असला पाहिजे,  असे ते म्हणाले.

●●●●●●●●●●●

संताच्या केवळ आरत्या गावू नका-विचारांचे आचारण करा

भारत महराज जाधव यांचे आवाहन


संतांच्या नुसत्या आरत्या गावू नका तर त्यांचे विचार आचारणात आणा, असे आवाहन पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महराज जाधव यांनी केले. महिलांना सध्या खूप पोथ्या वाचायला आवडतात, पण त्यांनी काल्पनिक पोथ्या वाचण्यापेक्षा सावित्रीबाई फुले, जिजामाता,  अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र वाचावे, असे आवाहनही जाधव महाराज यांनी केले.

शेतकरी कीर्तन महोत्सवामागील संकल्पना ह.भ.प शामसुंदर महराज सोन्नर यांनी प्रास्ताविकात मांडली. किसान सभेचे नेते अॅड. अजय बु-हांडे यांच्या संकल्पनेतून  हा कीर्तन महोत्सव सुरू करण्यात आला असून यात शेतक-यांच्या सामाजिक, आर्थिक, अध्यात्मिक, शारीरिक आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे, असेही शामसुंदर महाराज म्हणाले. यावेळी आनंद महाराज जोशी, राम गोसावी, शरद गलधर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या