Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत बसस्थानका बाबत जनतेचे दुर्भाग्य, महामंडळाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी  


परळीसह बीड जिल्ह्यातील सर्वच बस स्थानकातील बसचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे अगोदरच उन्हाने होरपळत असलेल्या प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका बसत असल्याने प्रवाश्यात संताप व्यक्त  केला जात आहे.

कृषी मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानकडून परळी बस स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी उन्हाळ्यात प्रवाशांची तहान भागवी  म्हणून बांधण्यात आलेली पाण्याची टाकी ही सध्या दुर्लक्षित असून परळी बस आगाराच्या  बेजबाबदारपणामुळे या पाणपोई तुट्या नसून सतत रिकामी  पाण्याच्या टाकी, पसरत अस्वच्छता असते...मोठा राजकीय वारसा असलेल्या परळीत बस्थानका बाबत जनतेचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल..याचे हे उदाहरण आहे. 

 परळी बसआगाराचा कारभार म्हणजे "आंधळा दळतो आणि ......पीठ खातो" अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.परळी बस डेपो म्हणजे "असून अडचण नसून खोळंबा"अशी संताप जनक प्रतिक्रिया परळीतील प्रवासी करत आहेत. 

या दूरावस्था कडे बस आगार प्रमुख कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, राज्य परिवहन महामंडळा कडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या कोणत्याच सुविधा बस्थानाकात उपलब्ध नाहीत. परळी आगारातील बसेसची अवस्था पाहता प्रवाशांना काळजी वाटते आहे.

आगाराकडे असलेल्या बसेसपैकी अधिक बस खिळखिळ्या झालेल्या आहेत. त्यातच वारंवार ब्रेक डाउन होणे, टायर फुटणे, तुटलेले छप्पर, खिडक्याला काच नसलेल्या बसेस परळी सिरसाळा मार्गे चालू असलेल्या रस्ता कामात यात उघड्या बसेस अनेकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. अशी एसटीची अवस्था झाली असून, या दुरवस्थेमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर त्याच त्या बसेस पुन्हा दुरुस्ती रंगरंगोटी करून चालवण्यात येत आहेत. अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.

विशेष म्हणजे प्रवाशांना तिकीट देण्याच्या अनेक मशीन खराब झाल्या आहेत त्या मशिन दुरुस्त केल्या जात नाहीत तर पेपर रोल सुद्धा वेळेवर दिला जात नसल्याने वाहकाना मोठया अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशी आधिक माहिती अनेक एसटीच्या कर्मचाऱ्यान कडून समजली आहे, त्यामुळे कर्मचारी बस स्थानकात वेळेवर उपस्थित असले तरी डेपोच्या ढासळत्या कारभाराचा मानसिक आणि आर्थिक फटका मात्र प्रवाशांना बसत आहे.

पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट , सगळीकडे घाणीचे साम्राज्य, थुंकलेले रंगीबेरंगी कोपरे, प्रवाशी बसण्याच्या ठिकाणी धूळ तसेच  बसचे वेळापत्रक सांगण्यासाठी कंट्रोलरुम मध्ये कर्मचाऱ्यांची आरे रे वीची भाषा..

 बस स्थानकात खड्डे, दगडगोटे  उघडे झाल्याने दिव्यांग आणि वयोवृद्ध प्रवाश्यांना नीट चालता येत नाही.

सर्वात मोठी राजकीय वारसा असलेल्या परळी बस्थानकाची अशी अवस्था व्हावी हे येथील जनतेचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या