Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भूकंप | नांदेड शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 आपला ई पेपर Nanded 


नांदेड शहरातील विवेकनगर, श्रीनगर, शिवाजीनगर भागात सौम्य धक्का जाणवला. या धक्याची तीव्रता 1.5 रिष्टर स्केल इतकी होती. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागातील भूकंपमापक यंत्रावर ही नोंद झाली. या घटनेची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनही नोंद घेतली आणि त्यानुसार माहिती मागवली आहे.सायंकाळीं 6 वाजून 18 मिनिटांनी धक्का जाणवला, दरम्यान जमीनीतून लोकांना आवाज ऐकू येऊ लागले, ज्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

विद्यापीठातील भूकंप मापन यंत्रणेच्या प्राथमिक अंदाजानुसार दहा किलोमीटर अंतरावर हा भुकंपाचा धक्क्याची नोंद झाली आहे.

नांदेडमध्ये या पूर्नी देखील म्हणजे 2008 आणि 2010-11 मध्ये असे भूकंपाचे सौम्य धक्के बसले असल्याची माहिती विद्यापीठातील भूशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. टी विजयकुमार यांनी दिली. दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या