Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Beed जिल्हाधिकार्यांचे फुलचंद कराड यांना आश्वासन वाण धरणातील पाणी नदीपात्रात सोडणार

 


आपला ई पेपर परळी प्रतिनिधी

 नागापुर येथील वाण धरणातील पाणी नदीपात्राशेजारील गावांना सोडण्यासाठी गेली 25 वर्षे सातत्याने प्रयत्न करत असलेले भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपा जेष्ठ नेते फुलचंद कराड यांनी सध्या जाणवत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वाण नदीपात्रात पाणी सोडावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांची भेट घेवुन निवेदन दिले.नदीपात्रात पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी यावेळी शिष्टमंडळास दिले.

  नागापुर येथील वाण धरणातील पाण्यावर परळी शहरासह तालुक्यातील 15 गावांना पाणीपुरवठा होत असतो.याबरोबरच या धरणातील पाण्यामुळे जनावरांची तहान भागत असते.सध्या वाण धरणात मुबलक पाणीसाठा असुन परिसरातील नागापुर,बहादुरवाडी,लिंबोटा,लिंबोटा तांडा,वडखेल,तडोळी,तडोळी तांडा आदी कमी पावसामुळे विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची भयानक टंचाई निर्माण झाली आहे.वाण नदीपात्रात पाणी सोडले तर या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होवु शकतो.वाण नदीपात्रात पाणी सोडावे यासाठी फुलचंद कराड यांनी गावकर्यांना सोबत घेत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांची भेट घेत नदीपात्रात पाणी सोडणे हे जमीनीसाठी नाही तर पिण्यासाठी किती आवश्यक आहे हे सांगितले.पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात येताच जिल्हाधिकार्यांनी वाण नदीपात्रात सोडण्याचे आश्वासन दिले.यावेळी शिष्टमंडळात लिंबोटा गावच्या सरपंच दैवशाला बनसोडे,उपसरपंच अरुण मुंडे,रवि कराड,पाटलोबा मुंडे,ओबीसी व्हीजेएनटी पार्टीचे नेते प्रशांत कराड,बाबुराव राठोड,प्रकाश राठोड,रमेश राठोड,विश्वनाथ पाटलोबा मुंडे,सुधाकर बनसोडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या